दावा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर खूप साऱ्या युजर्संनी एक फोटो या दाव्याने शेयर केली आहे की, पुण्यात रमाकांत जोशी नावाच्या डॉक्टरचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना मुस्लिमांनी खांदा दिला. फोटोत मुस्लिम समाजाच्या लोकांसोबत एक मृतदेह नेताना दिसत आहे.

फेसबुक युजर Mohd Zahid ने हा फोटो शेयर करीत मोठे कॅप्शन लिहिले आहे. यानुसार, पुण्यात MBBS डॉक्टर रमाकांत जोशी यांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यांचा एक मुलगा आहे. परंतु, तो अमेरिकेत राहतो. त्यांची पत्नी ७४ वर्षाची आहे. डॉक्टरांना वाटत होते की, चार लोकांनी त्यांना खांदा द्यावा. परंतु, करोना असल्याने कुणीच नातेवाईक समोर आले नाही. ही घटना तबलीग जमातीतील मुस्लिमांना कळली. त्यानंतर त्यांनी केवळ त्यांना खांदा दिला नाही तर अंत्यसंस्कार सुद्धा केले.

परंतु, पोस्टच्या खाली लिहिले आहे की, हा मजकूर अन्य ठिकाणाहून कॉपी केला आहे.

पोस्टचे आर्काइव्ड व्हर्जन

फोटोला याच कॅप्सनने अनेक युजर्संनी शेयर केले आहे. पाहा.

खरं काय आहे ?

फोटो याच वर्षी एप्रिल महिन्यातील आहे. ज्यावेळी मेरठच्या मुस्लिम परिसरात रमेश नावाच्या पुजारीचे निधन झाले होते. त्यानंतर जवळपासच्या लोकांनी खांदा दिला होता. सोशल मीडियावर फोटोसोबत लिहिलेला मजकूर चुकीचा आहे.

कशी केली पडताळणी ?

फोटोला रिव्हर्स सर्च केल्यानंतर आम्हाला रिझल्टमध्ये ‘Times of India‘ ची ३० एप्रिलची चापून आलेली एक
मिळाली. यात हाच फोटो वापरला आहे. या बातमीनुसार, लॉकडाऊनमुळे मेरठ मध्ये पुजारी ६८ वर्षाचे रमेश माथूर यांचे निधन झाले होते. त्यांना खांदा देण्यासाठी ४ लोक मिळत नव्हते. रमेश आपल्या कुटुंबासोबत मेरठच्या शाहपीर गेट परिसरात राहत होते. हा परिसर मुस्लिम बहुल भाग आहे.

या बातमीत म्हटले की, त्यांचा मुलगा म्हणतो, माझ्या वडीलांना फूड पाइप मध्ये ट्यूमर होते. उपचार सुरू होते. परंतु, अचानक त्यांचे निधन झाले. माझा मोठा भाऊ दिल्लीत राहतो. लॉकडाऊन असल्याने तो घरी पोहोचू शकला नाही. नातेवाईक पण आले नाहीत. यानंतर शेजाऱ्यांनी आमची मदत केली.

याशिवाय आम्ही व्हायर पोस्टच्या कॅप्शननुसार काही कीवर्ड गुगलवर सर्च केले. परंतु, आम्हाला अशी कोणतीही बातमी मिळाली नाही. विशेष म्हणजे करोनाने निधन झालेल्या व्यक्तीला असे चार खांद्यावर घेवून जाता येत नाही. त्यासाठी वेगळ्या कायद्याचे पालन करावे लागते.

निष्कर्ष

पुण्यात रमाकांत जोशीच्या डॉक्टरच्या मृत्यूनंतर तबलिगी जमातीमधील मुस्लिमांनी त्यांना खांदा दिल्याचा दावा चुकीचा आहे. या दाव्यासोबत जो फोटो शेयर केला जात आहे. तो एप्रिल महिन्यातील मेरठमधील आहे, असे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here