नवी दिल्लीः शाओमीने दोन दिवसाआधी भारतात आपला नवीन स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. आज या फोनोचा पहिला सेल आयोजित करण्यात आला आहे. आज दुपारी १२ वाजता ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉन आणि कंपनीची वेबसाइट एमआय डॉट कॉम वरून या फोनला खरेदी करता येवू शकते. तसेच या फोनला ऑफलाइन स्टोर्सवरून सुद्धा खरेदी करता येवू शकते. फोनची सुरुवातीची किंमत ६७९९ रुपये आहे. या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले 5,000mAh बॅटरी आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे.

वाचाः

फोनची किंमत
हा फोन दोन व्हेरियंटमध्ये येतो. याच्या २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या मॉडलची किंमत ६ हजार ७९९ रुपये आहे. तसेच ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या मॉडलची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. हा फोन तीन कलरमध्ये म्हणजेच नेचर ग्रीन, सी ब्लू आणि मिडनाइट ब्लॅक या रंगात उपलब्ध आहे.

वाचाः

रेडमी ९ एचे वैशिष्ट्ये
रेडमी ९ ए स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा IPS HD+ डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720×1,600 पिक्सल आहे. हा रेडमी ए सीरीजचा सर्वात कमी किंमतीचा फोन आहे. स्मार्टफोन अँड्रॉयड 10 आधारित MIUI 12 वर काम करतो. यात ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज दिला आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G25 प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात सिंगल रियर आणि सिंगल फ्रंट कॅमेरा दिला आहे. मागच्या बाजुला १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात बॅटरी मोठी दिली आहे. १० वॉट फास्ट चार्जिंगसोबत 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. तसेच फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी VoWiFi, यूएसबी पोर्ट, स्पीकर ग्रिल, 3.5mm हेडफोन जॅक, P2i कोटिंग, आणि 2+1 मायक्रोएसडी कार्ड स्लॉट दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here