नवी दिल्लीः भारत-चीन यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. केंद्रातील मोदी सरकारने ११८ चायनीज अॅप्सवर बंदी घातली आहे. यात PubG पासून Ludo सारख्या प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यात केंद्र सरकारने चायनीज संबंधी
अॅप्सवर बंदी घालण्याचे काम सुरू केले आहे. केंद्र सरकारने तिसऱ्यांदा अशा अॅप्सवर बंदी घातली आहे. या आधी ५९ अॅप्सवर त्यानंतर ४७ अॅप्सवर आणि आता ११८ अॅप्सवर बंदी घालून मोदी सरकारने चीनवर डिजिटल स्ट्राइक केला आहे. परंतु, अद्याप काही चायनीज अॅप्सवर बंदी घातली गेली नाही. गुगल प्ले स्टोरवर प्रसिद्ध आहेत. परंतु, ते या बंदीतून सुटले आहे. या अॅप्समध्ये , आणि यासारखे अॅप्स असून ते टॉप १०० अँड्ऱॉयड अॅप्सच्या लिस्टमध्ये उपलब्ध आहेत.

वाचाः

लागोपाठ वाढताहेत Snack Video चे युजर्स
जूनमध्ये टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर हे अॅप खूप प्रसिद्ध झाले आहे. स्नॅक व्हिडिओ एक सिंगापूर बेस्ड अॅप आहे. टिकटॉकची रिकामी जागा भरून काढण्यासाठी या अॅपकडे पाहिले जाते. याची पॅरंट कंपनी Kuaishou Technology आहे. जी एक प्रसिद्ध चायनीज सॉफ्टवेयर कंपनी आहे. यावर दिग्गज चीनी कंपनी Tencent चा मालकी हक्क आहे. सध्या हे अॅप गुगल प्ले स्टोरवर टॉप फ्री अॅप्सच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.

वाचाः

शाओमीचा Zili अॅप
हा सुद्धा एक शॉर्ट व्हिडिओ अॅप आहे. याची पॅरंट कंपनी चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन मेकर कंपनी Xiaomi आहे. हे सुद्धा गुगल प्ले स्टोरवर टॉप १०० अॅप्सपैकी एक आहे. परंतु, यावर अद्याप भारतात बंदी घातली नाही. केंद्र सरकारने याआधी २७५ अशा अॅप्सची लिस्ट तयार केली होती. यात झिली अॅपचा समावेश होता. राष्ट्रीय सुरक्षा आणि युजर प्रायव्हसीचे उल्लंघन करणाऱ्या अॅप्सवर भारतात बंदी घातली जाते.

वाचाः

बाइटडांसचा Resso अॅप
हे एक म्यूझिक स्ट्रिमिंग अॅप आहे. जो टिकटॉकच्या मालकी असलेली कंपनी ByteDance चे आहे. हे सुद्धा टॉप १०० अॅप्सपैकी आहे. याची प्रसिद्धी खूप आहे. जुलै महिन्यात १४ लाख आणि ऑगस्ट महिन्यात १५ लाख डाउनलोड्स या अॅप्सला मिळाले आहेत.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here