नवी दिल्लीः जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेरा नाही?, असे सांगितले तर विश्वास बसणार नाही. वापरायचा असेल तर असा एक फोन लाँच झाला आहे. घाबरून जाण्याचे कारण नाही. या फोनमध्ये सेल्फी कॅमेरा आहे. परंतु, तो दिसत नाही. जगातला पहिला इनव्हिजिबल सेल्फी कॅमेरा असलेला फोन लाँच झाला आहे. या फोनमध्ये सेल्फी कॅमेरा डिस्प्लेच्या खाली आहे. म्हणजेच तो दिसत नाही.

वाचाः

खूप साऱ्या कंपन्या अशा टेक्नोलॉजीवर काम करीत आहेत. याच्या मदतीने सेल्फी कॅमेरा डिस्प्लेच्या खाली दिला आहे. पंच होल किंवा नॉचची गरज फोनमध्ये नसणार आहे. तसेच कोणताही पॉप अप मॅकेनिज्म असणार आहे. अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर टेक्नोलॉजी आधी यशस्वी राहिली आहे. ज्यात आता खूप स्मार्टफोन्स मिळत आहे. चायनीज ब्रँड ZTE ने जगातील पहिला असा फोन लाँच केला आहे. ज्यात सेल्फी कॅमेरा डिस्प्ले खाली दिला आहे. तो दिसत नाही.

वाचाः

ZTE Axon 20 5G चे वैशिष्ट्ये
फोनमध्ये अँड्रॉयड १० बेस्ड कस्टम स्किन दिला आहे. यात ६.९२ इंचाचा 1080p+ OLED डिस्प्ले मिळतो. 20.5:9 आस्पेक्ट रेशियोचा डिस्प्ले मध्ये 90Hz चे रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सँपलिंग रेट मिळतो. हा फोन स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर दिला आहे. यात ८ जीबी रॅम सोबत २५६ जीबी स्टोरेज दिला आहे. फोनमध्ये रियर पॅनेलवर ६४ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. या सेटअपमध्ये 64+8+2+2MP सेंसर दिले आहे.

वाचाः

ZTE Axon 20 5G ची किंमत
सेल्फी कॅमेरा बाहेरून दिसत नाही. तसेच डिस्प्लेच्या खाली ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर आहे. फोनमध्ये 4,220mAh बॅटरी दिली आहे. जी 30W फास्ट चार्जिंग सोबत येते. या फोनला अनेक व्हेरियंट्समध्ये उतरवले आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजचा फोन २३ हजार ५०० रुपयांत खरेदी करता येवू शकते. तसेच याचा हाय अँड मॉडल ८ जीबी प्लस २५६ जीबी स्टोरेजसोबत येते. याची किंमत ३० हजार रुपये ठेवण्यात आली आहे.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here