नवी दिल्लीः रियलमीने भारतात आपला इलेक्ट्रिक Realme M1 Sonic ला भारतात लाँच केले आहे. १९९९ रुपये किंमत असेल्लया या इलेक्ट्रिक टूथब्रशमध्ये ९० दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ आहे. याचा सेल १० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. ब्लू आणि व्हाइट कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आलेल्या या रियलमी एम१ सोनिक टूथब्रशला फ्लिपकार्ट आणि रियलमीची अधिकृत वेबसाईट वरून खरेदी करता येवू शकते.

वाचाः

रियलमी M1 सोनिक इलेक्ट्रिक टूथब्रशचे फीचर
रियलमीचा हा टूथब्रश हाय फ्रीक्वेंसी सोनिक मोटर, अँटिबॅक्टिरियल ब्रिसल्स सोबत येते. ९० दिवसांची बॅटरी लाइफची इलेक्ट्रिक टूथब्रश एक मिनिटात ३४ हजार वेळा व्हायब्रेट करते. दातांची स्वच्छता चांगली व्हावी यासाठी हे इतक्या वेळेस व्हायब्रेट होते. या टूथब्रशची कॉम्पॅक्ट डिझाइन आहे. युज करताना यात 60dB पेक्षाही कमी आवाज येतो.

वाचाः

वाचाः

टूथब्रशमध्ये चार क्लिनिंग मोड्स देण्यात आले आहेत. यात सेंसिटिव्ह दातांसाठी सॉफ्ट, डेली युजसाठी क्लिन, डीप क्लिनिंगसाठी व्हाईट आणि चमकदार दातांसाठी पॉलिश मोड उपलब्ध आहेत. या टूथब्रशमध्ये कर्व्ड बॉडी आणि फ्रिक्शन कोटिंग दिली आहे. हातात पकडण्यासाठी खूप कंफर्टेंबल नॉन स्लिपरी बनवते. टूथब्रशमध्ये देण्यात आलेले ब्रिसल्स ब्लू इंडिकेटर सोबत येते.

वाचाः

वाचाः

ब्लू इंडिकेटरच्या या ब्रिसल साठी कलर फेड झाल्यानंतर युजर याच्या ब्रशला हेड बदलू शकतात. रियलमीने आपल्या इलेक्ट्रिक टूथब्रशला मेटल फ्री ठेवले आहे. कारण, कोणत्याही प्रकारची ओरल दुखापत होऊ नये. वायरलेस चार्जिंग सपोर्ट सोबत इलेक्ट्रिक टूथब्रश मध्ये 800mAh ची बॅटरी दिली आहे. याला चार्जिंगसाठी ४.५ तास लागतात. ५ मिनिटात चार्जिंग करून हे टूथब्रश दोन दिवस वापरता येते असे कंपनीचे म्हणणे आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here