नवी दिल्लीः वोडाफोनने देशभरातील आपल्या युजर्संसाठी दोन स्वस्त प्लान आणण्याची घोषणा केली आहे. यात खूप सारा डेटासोबत फ्री कॉलिंगचा फायदा मिळणार आहे. वोडाफोन-आयडिया युजर्संसाठी आणण्यात आलेल्या दोन नवीन प्लानची किंमत १०९ रुपये आणि १६९ रुपये आहे. या दोन्ही प्लान्सची वैधता २० दिवसांची आहे. तसेच या दोन्ही प्लानमध्ये मिळणाऱ्या डेटामध्ये मोठे अंतर आहे. हे दोन्ही प्लान आधी केवळ दिल्ली सर्कलसाठी आणले होते. परंतु, आता सर्व सर्कल्समध्ये युजर्स हे प्लान रिचार्ज करू शकतील.

वाचाः

नवीन १०९ रुपयांचा प्लान
वोडाफोन-आयडियाचा नवीन १०९ रुपयांच्या प्लानची वैधता २० दिवसांची आहे. यात एकूण एकूण १ जीबी डेटा आणि ३०० फ्री एसएमएस युजर्संना मिळतात. प्लानमध्ये युजर्संना देशभरात सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. अतिरिक्त बेनिफिट्समध्ये कंपनी या स्वस्त प्लानमध्ये Vodafone Play आणि ZEE5 अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन २० दिवसांसाठी ऑफर करते.

वाचाः

वाचाः

नवीन १६९ रुपयांचा प्लान
आधीच्या प्लानप्रमाणे वोडाफोन-आयडिया प्लानची वैधता २० दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्संना रोज १ जीबी डेटा (एकूण २० जीबी डेटा) मिळतो. रोज १०० फ्री एसएमएस मिळतात. सर्व नेटवर्क्सवर देशभरात युजर्संना अनलिमिटेड कॉलिंग करता येते. तसेच अतिरिक्त बेनिफिट्समध्ये युजर्संना Vodafone Play आणि ZEE5 अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

वाचाः

वाचाः

१२९ रुपये आणि १४९ रुपयांचा प्लान
दोन नवीन प्लान शिवाय युजर्संना १२९ रुपये आणि १४९ रुपयांचे टॅरिफ व्हाऊचर्सने रिचार्ज करू शकतात. १२९ रुपयांच्या प्लानमध्ये २४ दिवसांची वैधतेसोबत एकूण २ जीबी डेटा आणि ३०० एसएमएस मिळतात. तसेच याशिवाय, १४९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. दोन्ही प्लानमध्ये सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंग केले जावू शकते. नवीन प्लानप्रमाणे या प्लानमध्येही अडिशनल बेनिफिट्स मिळते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here