राहुल पोखरकर, ए. पी. शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

पॉवरडायरेक्टर

हे अॅप तुम्ही गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता. या अॅपच्या मदतीनं अगदी प्रोफेशनल वाटतील असे व्हिडीओज तुम्हाला बनवता येतील. ४के रेसोल्युशनपर्यंतचे व्हिडीओ तुम्ही बनवू शकता. तसंच तुमच्या व्हिडीओचा वेग जास्त असल्यास तो कमी करण्याचं फिचर या अॅपमध्ये उपलब्ध आहे. अॅपमध्ये उपलब्ध असलेल्या लायब्ररीमधून तुम्ही विविध इमेजेस तुमच्या व्हिडीओमध्ये अॅड करू शकता.

काइनमास्टर

काइनमास्टर हे अॅप अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्हींवर उपलब्ध आहे. या अॅपमध्ये व्हिडीओ एडिट करत असताना तुम्हाला मल्टीलेअर सपोर्ट मिळू शकेल. तसंच क्रोमा की हे फिचरसुद्धा उपलब्ध आहे. अॅपमधील प्रो ऑडिओ फिचर्स तुमचे एडिटिंगचं काम अधिक सोपं करू शकतं. तसंच तुमच्या व्हिडीओला विविध फिल्टर्स अॅड करू शकता.

अॅडोब प्रीमिअर रश

अॅडोब या नामांकित सॉफ्टवेअर कंपनीने अॅप आणलं आहे. या अॅपमध्ये उपलब्ध असलेल्या टेम्प्लेट्समध्ये तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे बदल करू शकता आणि तुमच्या व्हिडीओमध्ये अॅड करू शकता. तसंच व्हिडीओमधील एखादा ठरावीक भाग तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया साइटवर अपलोड करायचा असेल तर तेसुद्धा या अॅपच्या मदतीनं सहजपणे करता येईल.

क्विक

फोटोग्राफी विश्वातील नामांकित गो प्रो या कंपनीचं क्विक हे व्हिडीओ एडिटिंग अॅप आहे. त्यात कमीत कमी वेळेत व्हिडिओ बनवू शकतो. तुमच्या मोबाइलमधून ७५ फोटोज आणि व्हिडिओज तुम्हाला तुमच्या व्हिडिओसाठी वापरता येतील. तसंच अॅपमध्ये विविध प्रसंगानुसार २३ थीम उपलब्ध असून ते तुमचं काम सोपं करू शकतात.

फिल्मोरा गो

या अॅपमध्ये टाइमलाइन झूम, स्प्लिट ऑडिओ क्लिप्स आणि फिल्टर्स अँड ओव्हरलेज यासारखे फीचर्स उपलब्ध आहेत. तसंच या अॅपच्या मदतीनं तुम्ही तुमचे फिल्टर्ससुद्धा तयार करू शकता. तसंच अॅपमध्ये उपलब्ध असलेले स्टिकर्स वापरून तुम्हाला तुमचे व्हिडीओज अधिक मजेशीर बनवता येतील. शिवाय, या अॅपच्या मदतीनं एका कॅनव्हासवर तुम्ही तुमचे व्हिडीओज बनवू शकता.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here