नवी दिल्लीः व्हॉट्सअॅपमध्ये सध्या वेगळेच मेसेज येत आहेत. हे मेसेज रिसिव्ह होताच अॅप क्रॅश होतो किंवा फ्रीज होतो. हे मेसेज लांब आणि स्पेशल कॅरेक्टर्सच्या मदतीने लिहिले आहेत. त्यामुळे डिकोड करू शकत नाही. त्यामुळे अॅप क्रॅश होण्याची अडचण येत आहे. ब्राझील सह जगातील अनेक युजर्संना ही समस्या येत आहे.

वाचाः

मेसेज प्रोसेस न केल्याने क्रॅश होतोय अॅप
WABetaInfo ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, हे मेसेजमध्ये वेगळ्याच कॅरेक्टर्सचा वापर केला आहे. याचा काहीच अर्थ निघत नाही. जर तुम्ही संपूर्ण वाचले तर त्यातून काहीच अर्थ निघत नाही. व्हॉट्सअॅप या मेसेजला चुकीचे समजतो. त्यामुळे अनेकदा मेसेज पूर्णपणे रेंडर होत नाही. कारण, त्यांचा स्ट्रक्चर पूर्णपणे वेगळा असतो. या मेसेजच्या कॉम्बिनेशनमुळे मेसेजची प्रोसेस पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे ते क्रॅश होते.

वारंवार अॅप ओपन करूनही फरक पडत नाही
अॅप क्रॅश झाल्यानंतर अॅप ओपन होत नाही. युजर वारंवार अॅप ओपन करण्याचा प्रयत्न करतो. परंतु, काही फरक पडत नाही. जगभरातील युजर्संनी या समस्यांसंबंधी रिपोर्ट केले आहे. परंतु, ब्राझीलच्या युजर्संना सर्वात जास्त अडचण येत आहे.

वाचाः

व्हर्च्युअल कार्डने येतेय मेसेज
रिपोर्टमध्ये म्हटले की, मेसेज व्हर्च्युअल कार्ड ने पाठवता येतात. जर तुम्ही व्हर्च्युअल कार मेसेज ओपन केले तर या ठिकाणी १०० असोसिएटेड कॉन्टॅक्ट असतील. प्रत्येक कॉन्टॅक्ट खूप मोठा आणि वेगळा असतो. यात क्रॅश कोड छापलेला असतो. अनेकदा व्हर्च्यूअल कार्ड्समध्ये छेडछाड करून Payload इंजेक्ट केले जाते. त्यामुळे ही समस्या आणखी गंभीर बनते.

कसे राहाल दूर
जर तुम्हाला असे वेगळे कॅरेक्टरचे मेसेज येत असतील त्याला तात्काळ ब्लॉक करा. कॉन्टॅक्ट ब्लॉक केल्यानंतर ग्रुपच्या प्रायव्हसी सेटिंगला ‘My Contacts’ किंवा ‘My Contacts Except’वर सेट करा. यात जर तुम्हाला व्हॉट्सअॅप अॅक्सेस करीत असाल तर तुम्ही व्हॉट्सअॅप वेबच्या मदतीने क्रॅश कोड मेसेज डिलीट करायला हवेत. हे होत नसेल तर व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉर करून पुन्हा इन्स्टॉल करा. परंतु, त्यामुळे तुमची चॅट हिस्ट्री डिलीट होवू शकते.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here