नवी दिल्लीः रिलायन्स जिओ लवकरच १० कोटींहून अधिक लो-कॉस्ट स्मार्टफोन आणण्याची तयारी करीत आहे. ही माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हा अँड्रॉयड स्मार्टफोन असणार आहे. तसेच यासोबत डेटा पॅक्सचाही समावेश आहे. बिझनेस स्टँडर्ड वृत्तपत्राच्या सूत्रांच्या माहितीनुसार, रिलायन्स जिओ गुगलच्या अँड्रॉयड प्लॅटफॉर्मवर काम करीत आहे.

वाचाः

वाचाः

रिपोर्टच्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन डेटा पॅक्ससोबत येईल. डिसेंबर २०२० किंवा पुढील वर्षीच्या सुरुवातीला लाँच केला जावू शकतो. भारतातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनीने जुलैमध्ये सांगितले होते की, गुगल त्यांच्या डिजिटल युनिटमध्ये ४.५ बिलियन डॉलर (३३ हजार १०२ कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजचे मालक मुकेश अंबानी यांनी सांगितले होते की, एक असा अँडॉयड ऑपरेटिंग सिस्टम बनवणार आहे जे रिलायन्सच्या डिव्हाईसमध्ये लो कॉस्ट मध्ये 4G आणि 5G स्मार्टफोनवर काम करेन.

वाचाः

वाचाः

चिनी कंपन्यांना मिळणार टक्कर
रिलायन्सचा हा स्वस्त स्मार्टफोन चिनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi आणि BBK इलेक्ट्रॉनिक्स (रियलमी, ओप्पो आणि विवोची पॅरेंट कंपनी) यासारख्या ब्रँड्सला टक्कर देणार आहे. चीनी फोन कंपन्यांचे भारतीय स्मार्टफोन बाजारात मोठे मार्केट शेयर आहे. येथे विकणाऱ्या १० पैकी ८ स्मार्टफोन चीनी कंपनीचे आहेत.

वाचाः

वाचाः

रिलायन्स जिओने याआधी २०१७ मध्ये अशाच स्ट्रेटेजीवर काम केलेले आहे. त्यावेळी कंपनीने JioPhone फीचर फोन लाँच केला होता. देशात आता जिओफोनचा १० कोटीहून अधिक युजर्स आहेत. ज्यात अनेक जण फर्स्ट टाइम इंटरनेट युजर आहेत.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here