नवी दिल्लीः रियलमीचा नवीन स्मार्टफोन ला युजर्संचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. १० सप्टेंबर रोजी झालेल्या पहिल्या सेलमध्ये कंपनीच्या या फोनची १८०००० हून अधिक विक्री झाली आहे. कंपनीला स्टॉक संपल्यानंनतर विक्री बंद करावी लागली. १७ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येईल, असे कंपनीने सांगितले आहे.

वाचाः

रियलमी ७ च्या या परफॉर्मन्स मुळे कंपनी खूष झाली आहे. रियलमी मोबाइलने आपल्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेयर करून या सेलची माहिती दिली आहे. पोस्टमध्ये कंपनीने हेही लिहिले की ६४ मेगापिक्सलचा हा फोन लवकरच स्टॉकमध्ये असणार आहे.

वाचाः

वाचाः

Realme 7 स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ६.५ इंचाचा Full HD+ डिस्प्ले दिला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट सोबत येतो. डिस्प्लेत सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंचहोल मिळतो. तसेच पॉवर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. यात ८ जीबी रॅम पर्यंत १२८ जीबी पर्यंत स्टोरेज आणि मीडियाटेक हीलियो G95 प्रोसेसर दिला आहे. तसेच फोनमध्ये ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी मिळते.

वाचाः

वाचाः

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा सोनी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनचा सेल आता येत्या १७ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here