नवी दिल्लीः देशात अनेक अशा कंपन्या आहेत ज्या ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. करोना मुळे लोक ऑनलाइनल पसंती देत आहेत. त्यामुळे ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून ई-कॉमर्स कंपन्यांची वेबसाईट आणि अॅपला क्लोन बनवून लोकांना चुना लावण्याचे सर्रास घडत आहे. ज्यावेळी तुम्ही या वेबसाइट्स किंवा अॅप्सवर पेमेंट केल्यानंतर काही तासात किंवा काही दिवसात याच्या आतील लिंक गायब होते. सायबर सेलकडून याचा तपास केला जात आहे.

वाचाः

ब्रँडेड ई-कॉमर्स वेबसाईट्स किंवा अॅप्सचे फेक क्लोन बनवून ही फसवणूक केली जाते. सामानांवर ६० ते ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ऑफर करीत असतात. त्यामुळे अनेक जण फसतात. ग्राहकांना सामान स्वस्त किंमतीत खरेदी करण्याचे अमिष दाखवले जाते. परंतु, ज्यावेळी याचे पेमेंट केले जाते. त्या सामानांची डिलिवरी कधीच येत नाही. दोन ते तीन दिवसांत त्याची लिंक सुद्धा डिलीट केली जाते.

वाचाः

सायबर गुन्हेगार फेक वेबसाइट बनवून गुगल एडवर्ड्सद्वारे त्याला ट्रेंड करीत असतात. त्यामुळे गुगलवर काही सामान खरेदी करण्यासाठी टाईप केले तर फेक वेबसाईट सर्वात वर दिसते. हे गुन्हेगार फेक वेबसाईट्स आणि लिंकवर कमाई केल्यानंतर त्या लिंकला तात्काळ डिलीट करतात. जोपर्यंत लोकांना समजते. तोपर्यंत वेबसाईट्स किंवा अॅप्स डिलीट केलेले असते. लिंक डिलिट केल्यानंतर त्याला ट्रॅक करणे कठीण होऊन जात असल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्ले स्टोरवर फेक अॅप्सची लाट आहे. फेक अॅप्स प्ले स्टोरवर लाँच करणे सोपे आहे. युजर्स या सारख्या अॅप्सच्या जाळ्यात अलगद अडकतात. या अॅप्सवरून कमाई झाल्यानंतर गुन्हेगार त्याला डिलीट करतात.

वाचाः

अनेक ग्राहकांना फेक वेबसाईट संबंधी माहिती झाली आहे. ज्यावेळी डिलीवरी आली नाही त्यावेळी त्यांनी कस्टमर केयरला फोन केला आहे. कस्टमर केयरने अशा ग्राहकांना सांगितले की, अशी कोणतीही वेबसाइट नाही. तसेच कंपनीने अशी कोणतीही ऑफर दिली नाही.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here