वाचाः
कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेयर केली आहे. यात सांगितले की, पहिल्याच सेलमध्ये NFC स्मार्टफोनने रेकॉर्ड बनवला आहे. पोको चाहत्यांना धन्यवाद देताना कंपनीने विक्रीचे आकडे सुद्धा शेयर केले आहेत. फोटोत दिसतेय की, ३ सेकंदात १०००, पहिल्या ३० मिनिटात १० हजार, पहिल्या एका तासांत १५ हजार, पहिल्या दिवशी ६१ हजार आणि तीन दिवसांत १ लाखांहून अधिक फोनची विक्री झाली आहे. या फोनची किंमत कमी आहे.
वाचाः
फ्लॅगशीप सारखे फीचर्स
फोनमध्ये ६.६७ इंचाचा FHD+ डॉट डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट दिला आहे. याचा टच सँपलिंग रेड 240Hz आहे. जबरदस्त डिस्प्ले फ्लॅगशीप लेवलच्या फोनच्या हार्डवेयरला टक्कर देतो. तसेच यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर सोबत लाँच होणारा पहिला फोन आहे. यात ६ जीबी रॅमपर्यंत स्टोरेज मिळते. नवीन फोनला ६४ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेज पर्यायात उतरवले आहे.
वाचाः
२० हजारांपेक्षा कमी किंमत
या फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. यात पॉवरफुल क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा दिला आहे. २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ८०० रुपये तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १९ हजार ७५० रुपये आहे.
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times