वाचाः
५९९ रुपयांचा जिओ प्लान
जिओचा हा प्लान खूप प्रसिद्ध आहे. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये रोज २ जीबी हाय स्पीड डेटा ऑफर केला जातो. म्हणजेच एकूण १६८ जीबी डेटा या प्लानमध्ये मिळतो. दर रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर युजर्संना 64Kbps स्पीड सोबत इंटरनेटचा फायदा मिळू शकतो. म्हणजेच युजर्सला १ जीबी साठी ५९९ रुपयांच्या या प्लानमध्ये केवळ ३.५७ रुपये मोजावे लागतात.
वाचाः
हा प्लान कंपनीच्या २४९ रुपये आणि ४४४ रुपयांच्या प्लानपेक्षा स्वस्त प्लान आहे. ४४४ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. यात एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच १ जीबी डेटासाछी ४ रुपये मोजावे लागतात. रिलायन्स जिओच्या प्रीपेड पॅकमध्ये जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंग तर अन्य नेटवर्कवर कॉलिंग साठी ३ हजार मिनिट्स मिळतात. या पॅकमध्ये रोज १०० फ्री एसएमएस मिळतात. तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
वाचाः
वाचाः
एअरटेलचा ५९८ रुपयांचा प्लान आहे. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. यात रोज १.५ जीबी डेटा रोजी मिळतो. यात एकूण १२६ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच १ जीबी डेटासाठी ४.७५ रुपये खर्च करावे लागतात. वोडाफोन आयडियाचा ५९९ रुपयांचा प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. यात रोज १.५ जीबी डेटा मिळतो. १ जीबी डेटा साठी वोडाफोन पॅकमध्ये ४.७५ रुपये खर्च करावे लागतात.
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times