वाचाः
91मोबाइल्स आणि टिप्स्टर ईशान अग्रवाल यांच्या लीक्ड रिपोर्ट नुसार रेडमी ९ आय स्मार्टफोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये असणार आहे. जर हा रिपोर्ट खरा ठरला तर रेडमी ९ आय कंपनीच्या रेडमी ९ ए पेक्षा थोडा महाग आणि रेडमी ९ पेक्षा थोडा स्वस्त फोन ठरणार आहे. कंपनी या सीरीजमधील Redmi 9, Redmi 9A, Redmi 9 Prime स्मार्टफोन आधीच लाँच केलेले आहेत.
वाचाः
रिपोर्टमध्ये हेही सांगितले की, रेडमी 9i दोन व्हेरियंट मध्ये येणार आहे. यात ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज दिला जावू शकतो. टॉप व्हेरियंटची किंमत किती असू शकते, यासंबंधी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हा स्मार्टफोन तीन कलरमध्ये मिडनाइट ब्लॅक, सी ब्लू आणि नेचर ग्रीन मध्ये येवू शकतो.
वाचाः
वाचाः
काय असतील फीचर्स
रेडमीच्या या नवीन फोन मध्ये वॉटरड्रॉप नॉच दिली जावू शकते. सीरीज मधील बाकीच्या फोनमध्ये दिली आहे. यात ३.५ एमएम जॅकफोन आणि एक्सटर्नल मायक्रो एसडी कार्डचा सपोर्ट दिला जावू शकतो. तसेच फोनमध्ये मोठा डिस्प्ले, गेमिंग लायक प्रोसेसर, जबरदस्त कॅमेरा आणि मोठी बॅटरी दिली जावू शकते.
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times