नवी दिल्लीः एप्रिलमध्ये जीएसटी दरात वाढ करण्यात आल्यानंतर सर्वच स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. यात सॅमसंगपासून वनप्लस आणि रियलमी यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

वाचाः

आणि A50s
सॅमसंग गॅलेक्सी A51 जगातील सर्वात प्रसिद्ध अँड्रॉयड आहे. याच्या किंमतीत २ हजारांपर्यंत कपात करण्यात आली आहे. याच्या ६ जीबी रॅमच्या फोनची किंमत २३ हजार ९९९ रुपये आणि ८ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत २५ हजार ९९९ रुपये आहे. तसेच सॅमसंग A50s च्या किंमतीत ६ हजारांपर्यंत कपात करण्यात आली आहे. आता या या फोनच्या ४ जीबी रॅम व्हर्जनची किंमत १८ हजार रुपये आणि ६ जीबी रॅमच्या फोनची किंमत २० हजार ५६१ रुपये आहे.

वाचाः

सॅमसंग गॅलेक्सी A21s, A31 आणि A71
सॅमसंग गॅलेक्सी A21s आणि A71 च्या किंमतीत २ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर गॅलेक्सी A31 च्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. गॅलेक्सी A21s च्या ४ जीबी रॅमला १४ हजार ९९९ रुपये आणि ६ जीबी रॅमच्या फोनची किंमत १६ हजार ४९९ रुपये झाली आगहे. तर गॅलेक्सीए३१ आणि ए७१ एकाच व्हेरियंटमध्ये येते. याची किंमत २० हजार ९९९ रुपये आणि ३० हजार ९९९ रुपये झाली आहे.

वाचाः

सॅमसंग गॅलेक्सी Z Flip आणि नोट 10 lite
सॅमसंग गॅलेक्सी Z Flip कंपनीचा फोल्डेबल स्मार्टफोन आहे. याची किंमत ७ हजार रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. आता या कपातीनंतर या फोनची किंमत १ लाख ८ हजार ९९९ रुपये झाली आहे. तसेच १ हजार रुपयांच्या कपातीनंतर सॅमसंग गॅलेक्सी नोट १० च्या ६ जीबी रॅम फोनची किंमत ३७ हजार ९९९ रुपये आणि ८ जीबी रॅमच्या व्हेरियंटची किंमत ३९ हजार ९९९ रुपये झाली आहे.

रियलमी 6 आणि रियलमी 6i
रियलमीच्या या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमतीत १ हजारांची कपात करण्यात आली आहे. रियलमी ६ च्या 4GB + 64GB मॉडलची किंमत १४ हजार ९९९ रुपये आणि 6GB + 128GB मॉडलची किंमत १५ हजार ९९९ रुपये झाली आहे. रियलमी 6i च्या 4GB + 64GB मॉडलची किंमत १२ हजार ९९९ रुपये आणि 6GB + 64GB मॉडलची किंमत १३ हजार ९९९ रुपये झाली आहे.

वाचाः

वनप्लस 7T Pro
या स्मार्टफोनच्या किंमतीत ७ हजार रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. या स्मार्टफोनचा एकच व्हेरियंट 8GB + 256GB उपलब्ध आहे. याची किंमत ४७ हजार ९९९ रुपये आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here