नवी दिल्लीः लागोपाठ आपल्या युजर्ससाठी नवीन फीचर आणत आहे. लेटेस्ट रिपोर्टमधून माहिती उघड झाली आहे की, अँड्रॉयड बीटा अॅप मध्ये नवीन स्टिकर पॅक दिसले आहे. तसेच वॉलपेपर्स मध्ये सुद्धा काही बदल करण्यात आले आहेत. व्हॉट्सअॅपमध्ये प्रत्येक चॅटसाठी वेगवेगळे वॉलपेपर लावण्याच्या फीचरवर काम सुरू आहे. या फीचरला WhatsApp Dimming असे नाव दिले जाणार आहे.

वाचाः

WABetaInfo ने व्हॉट्सअॅप चे लेटेस्ट बीटा अँड्रॉयड व्हर्जन 2.20.200.6 मध्ये नवीन स्टीकर पॅक दिसले आहे. या स्टिकर पॅकला अॅपमध्ये दिलेली डिफॉल्ट स्टिकर लिस्ट मध्ये अॅड करण्यात आले आहे. नवीन स्टिकर पॅकचे नाव Usagyuuun आहे आणि याला Quan Inc नावाच्या एका कंपनीने बनवले आहे. हे एक अॅनिमेटेड स्टिकर पॅक आहे. याआधी बीटा अॅप मध्ये अॅनिमेटेड स्टिकर पॅक फीचर पाहिले गेले होते. या पॅकमध्ये व्हाईट कलरचे कार्टून आहे जे joy, anxiety, sadness, love यासारख्या फीलिंग्स सोबत येते.

वाचाः

स्टिकर पॅकची साईज ३.५ एमबी लिस्ट करण्यात आली आहे. स्टिकर पॅक सध्या लेटेस्ट बीटा पॅकमध्ये इनेबल आहे तसेच याचा वापर करता येईल. तसेच, रिपोर्टमध्ये हेही सांगितले आहे की, व्हॉट्सअॅप 2.20.200.6 बीटा अँड्रॉयड मध्ये एक नवीन वॉलपेपर डिमिंग फीचर आले आहे. हे युजर प्रीफरेंससाठी तुमच्या हिशोबाप्रमाणे कलर टोन बदलतो. आगामी काही दिवसांत नवीन वॉलपेपर सेक्शनमध्ये अॅड केले जाणार आहे. सध्या यावर काम सुरू आहे. WABetaInfo ने एक स्क्रीन शॉट शेयर केला आहे. ज्यात ‘Wallpaper Dimming’ टॉगल ला स्क्रीन वर खालच्या बाजुला पाहिले जावू शकते.

वाचाः

टॉगलला लेफ्ट किंवा राईटच्या बाजुला स्वाईफ करण्याने वॉलपेपरचा रंग बदलला जाईल. युजर आपल्या डोळ्याच्या सुविधेनुसार कलर चेंज करू शकेल. WABetaInfo च्या माहितीनुसार, या फीचरवर आतापर्यंत काम सुरू आहे. हे भविष्यात येणाऱ्या अपडेटसोबत उपलब्ध होईल.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here