नवी दिल्लीः विवो कंपनी आपल्या दोन स्मार्टफोनच्या आणि किंमतीत कपात केली आहे. दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. विवोच्या नवीन फोन्सच्या किंमती कंपनीची अधिकृत वेबसाईट आणि ई-रिटेलर्स यासारख्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर नवीन किंमतीसह लिस्ट करण्यात आले आहे. विवो वाय ५० ला जूनमध्ये तर विवो एस१ प्रोला जानेवारीत भारतात लाँच करण्यात आले होते.

वाचाः

Vivo Y50, Vivo S1 Pro ची भारतात किंमत
Vivo Y50च्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत आता १६ हजार ९९० रुपये झाली आहे. याला जूनमध्ये लाँच करण्यात आले त्यावेळी १७ हजार ९९० रुपये किंमत होती. याच्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. हा फोन आयरिश ब्लू व पर्ल व्हाइट कलरमध्ये येतो. याला अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, विवो ऑनलाइन स्टोर आणि ऑफलाइन रिटेलर्स वरून खरेदी केले जावू शकते.

वाचाः

Vivo S1 Pro च्या किंमतीत कपातीनंतर आता ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १८ हजार ९९० रुपये झाली आहे. फोनला १९ हजार ९९० रुपयात लाँच करण्यात आले होते. हा फोन मिस्टिक ब्लॅक, जेजी ब्लू आणि ड्रीमी व्हाईट कलर मध्ये येतो. मार्च महिन्यात या फोनची किंमत १ हजार रुपयांनी कमी केली होती. परंतु, एप्रिल महिन्यात जीएसटीत बदल झाल्यानं पुन्हा या फोनची किंमत २० हजार ९९० रुपये करण्यात आली होती. जुलै मध्ये फोनची किंमत १ हजारांनी स्वस्त करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा हा फोन १८ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकतो.

वाचाः

विवोच्या या स्मार्टफोनमध्ये कपात करण्यात आल्याची सर्वात आधी माहिती मुंबईचे रिटेलर महेश टेलिकॉमने ट्विटरवर दिली आहे. रिटेलरने हेही सांगितले की, विवो वाय २० ला लवकरच ६ जीबी रॅम स्टोरेजचे नवीन व्हेरियंट मध्ये लाँच केले जाणार आहे. आता विवो वाय ३० ३जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंट मध्ये येते.

वाचाः

Vivo Y50 चे वैशिष्ट्ये
Vivo Y50 मध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले, पंच होल डिझाईन आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर, ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, २ मेगापिक्सलचा पोट्रेट, सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे.

वाचाः

Vivo S1 Pro चे वैशिष्ट्ये
Vivo S1 Pro मध्ये ६.३८ इंचाचा फुल एचडी आर सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. यात ८ जीबी रॅम, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर दिला आहे. स्टोरेज १२८ जीबी पर्यंत आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4500mAh बॅटरी दिली आहे. १८ वॉट ड्यूल इंजिन फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here