नवी दिल्लीः ३५ कोटी फीचर फोन युजर्ससाठी टेलिकॉम कंपन्यात मोठी टक्कर होणार आहे. रिलायन्स जिओ सब्सिडीच्या सिम लॉक्ड स्मार्टफोनसाठी चायनीज हँडसेट मेकरसोबत आपली डील फायनल करणार आहे. रिलायन्स जिओच्या या स्मार्टफोन्स ४जी डेटा, व्हाइस आणि स्वतः कॉन्टेंट सर्विस सोबत येईल. कंपनीने चीच्या आयटेल ब्रँडसोबत पहिला टायअप केला आहे. याअंतर्गत ३.४ हजार रुपयांच्या किंमतीचे स्मार्टफोन लाँच करण्यात येतील.

वाचाः

जिओ गुगल पार्टनरशी अंतर्गत डेव्हलप होतील फोन
नवीन स्वस्त स्मार्टफोनला जिओ – गुगल पार्टनरशीप अंतर्गत डेव्हलप केले जाईल. या पार्टनरशीपने जिओचे टार्गेट आहे की, ३५ कोटी फीचर फोन युजर्सला आपल्या नेटवर्कने जोडता यावे. यातील जास्ती युजर जिओचे प्रतिस्पर्धी आणि वोडाफोनचे आहेत.

वाचाः

स्वस्त ४जी स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत एअरटेल
ईटीच्या एका रिपोर्टनुसार, एअरटेल सुद्धा काही हँडसेट्स मेकर्स सोबत २ ते २.५ हजार रुपयांच्या सब्सिडाइज्ड सिम लॉक्ड स्मार्टफोन्ससंबंधी चर्चा करीत आहे. एअरटेल देशातील सर्वात मोठी दुसरी टेलिकॉम कंपनी आहे. वोडाफोन-आयडिया 2G/3G यूजर्सची संख्या १३.८ कोटी आहे.

वाचाः

जिओचे २जी मुक्त भारत प्रोजेक्टचा भाग
एक इंडियन ब्रँडच्या एग्झक्यूटिवने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, एका बाजुला आयटेल iTelशी पार्टनरशीप झाली आहे. दुसऱ्या बाजुला स्वस्त ४जी स्मार्टफोन्ससाठी इंडियन हँडसेट्स ब्रँड्ससोबत पार्टनरशीप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिओचा हा २जी मुक्त भारत प्रोजेक्टचा भाग आहे. जिओ आणि iTel ने यासंबंधी ईटीच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.

वाचाः

सुरुवातीला १ कोटी हँडसेट्सची ऑर्डर
आणखी एका इंडियन हँडसेट्स ब्रँडच्या टॉप एग्झिक्यूटीवने सांगितले की, स्वस्त ४जी स्मार्टफोन्ससाठी इंडियन हँडसेट्स प्लेयर्स आणि ग्लोबल कॉन्टॅक्ट मॅन्यूफॅक्चरर्सशी चर्चा सुरू आहे. कंपनी या डिव्हाईसला जिओ ब्रँड आणि गुगलची पार्टनरशीप सोबत लाँच करू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, जिओची प्लानिंग आहे की, सुरुवातीला १ कोटी स्मार्टफोन्सची ऑर्डर देण्यासाठी जिओ प्रयत्नशील आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here