वाचाः
पोकोने ट्विटरवर नवीन फोनच्या लाँचिंगची माहिती एका १० सेकंदाच्या व्हिडिओतून दिली आहे. यात फोनचा फ्रंट आणि बॅक पॅनेल पाहिले जावू शकते. टीझर पाहिल्यानंतर फोनचा डिस्प्ले पंच होल डिझाइनचा आहे. रियरमध्ये या फोनमध्ये क्वॉड कॅमेरा दिला आहे. फोनचा सेल फ्लिपकार्टवर होणार आहे.
वाचाः
इतकी असू शकते किंमत
या फोनची किंमत कंपनी किती ठरवते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एका रिपोर्टमधून हा दावा करण्यात आला होता की, कंपनी पोको एक्स ३ ला १८ हजार ९९९ किंवा १९ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत लाँच करू शकते.
वाचाः
हे फीचर्स मिळू शकतात
फोन मध्ये 120Hz के रिफ्रेश रेट सोबत ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जावू शकतो. हा फोन ८ जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर दिला जावू शकतो. फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेटअप सोबत एक १३ मेगापिक्सलचा वाइड अँगल सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेनस्र आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर दिला जावू शकतो. सेल्फीसाठी फोनमध्ये २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जावू शकतो. फोनमध्ये ३३ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट सोबत दमदार बॅटरी मिळू शकते.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times