नवी दिल्लीः टेक ब्रँड मोटोरोलाचा फोल्डेबल Moto RAZR स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. कंपनीने आता याचे अपग्रेड व्हर्जन आणले आहे. नवीन चा पहिला सेल नुकताच पार पडला. अवघ्या दोन मिनिटात सर्व फोन विकले गेले. यात आश्चर्य म्हणजे या फोनची किंमत ३० – ४० हजार नव्हे तर तब्बल १ लाख ३६ हजार रुपये आहे. फोनची किंमत इतकी महाग असूनही ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीने या फोनचा पुढचा सेल आता २१ सप्टेंबर रोजी ठेवला आहे.

वाचाः

फोल्डिंग स्क्रीनसाठी मोटोरोने या फोनमध्ये खूप खास हिंज मॅकनिज्म दिले आहेत. लेनोवाने यासंबंधी डिटेल्स शेयर केले आहेत. कंपनीने म्हटले की,Motorola RAZR 5G इंडस्ट्रीचा एक्सक्लूसिव १०० हून अधिक पेटेंट्सचा स्टार ट्रॅक शाप्ट वापर करतो. या हिंज च्या मदतीने स्क्रीन कर्व्ड होवून फोल्ड होते. तसेच वारंवार फोल्ड झाल्यानंतर सुद्धा फोन ओपन करताना डिस्प्ले फ्लॅट होतो. तसेच वापर करण्यास सोपे जाते.

वाचाः

Motorola RAZR 5G ला २००,००० वेळा फोल्ड -अनफोल्ड केले जावू शकते. याचाच अर्थ एखादा युजर फोनचा वापर कमीत कमी ५ वर्षापर्यंत करू शकतो. तसेच या फोनमध्ये फ्लेक्सिबल स्क्रीनचा वापर वॉटरड्रॉप शेपमध्ये करतो. सर्वात आधी लेनोवोना रिसर्च इंस्टीट्यूटकडून इंट्रोड्यूस करण्यात आला. तसेच इलास्टिक मेटल स्ट्रक्चर डिस्प्ले ला ओपन केल्यास फ्लॅट ठेवतो.

वाचाः

Motorola RAZR 5G ची वैशिष्ट्ये
मोटोरोलाच्या नवीन फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये ६.२ इंचाचा ओलेड डिस्प्ले दिला आहे. जो फोल्ड होऊ शकतो. तसेच फोनच्या बाहेर सेकंड स्क्रीन सुद्धा दिली आहे. याची साईज २.७ इंच आहे. पॉवर फुल परफॉर्मन्स साठी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 2800mAh ची बॅटरी दिली आहे. तसेच 15W फ्लॅश चार्जिंग चा सपोर्ट दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here