नवी दिल्लीः सॅमसंग लवकरच आपला आणखी एक स्वस्त स्मार्टफोन गॅलेक्सी ए०२ आणू शकते. कंपनीच्या मागील वर्षी आलेल्या गॅलेक्सी ए०१ चे अपग्रेड मॉडल असणार आहे. नुकतेच या फोनला गीकबेंच वर पाहिले गेले आहे. यात फोनची काही वैशिष्ट्ये बाहेर आली आहेत. सॅमसंगच्या या फोनमध्ये २ जीबी रॅम आणि ऑक्टा-कोर क्वॉलकॉम प्रोसेसर मिळू शकतो. हा फोन कंपनीचा नवा बजेट स्मार्टफोन असणार आहे.

वाचाः

गॅलेक्सी ए सीरीजच्या या नवीन फोनमध्ये कंपनी अँड्रॉयड १० वर आधारीत सॅमसंग एवयूआय देवू शकते. यात आधी आलेल्या एका रिपोर्टनुसार, म्हटले होते की, सिंगल कोर टेस्टमध्ये ७४६ स्कोर आणि मल्टिकोर टेस्टमध्ये ३८ १० स्कोर मिळवले होते. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४५० प्रोसेसर मिळू शकतो.

वाचाः

काय आहेत फोनची वैशिष्ट्ये
सॅमसंग गॅलेक्सी ए०१ स्मार्टफोमध्ये ५.७ इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी व्ही डिस्प्ले मिळू शकतो. यात २ जीबी रॅम प्लस १६ जीबी इंटरनल स्टोरेज मिळतो. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकतो. गॅलेक्सी ए०१ अँड्रॉयड ९ पाय आधारित सॅमसंग वन यूआय वर काम करतो.

वाचाः

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा आणि सिंगल फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. रियरमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात फोनला पॉवर देण्यासाठी 3,000mAh ची बॅटरी दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here