नवी दिल्लीः रियलमीचा ७ प्रो स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी आज ग्राहकांना मिळणार आहे. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट आणि कंपनीची वेबसाइट रियलमी डॉट कॉमवर आज दुपारी १२ वाजता या फोनचा सेल सुरु होणार आहे. २० हजारांपेक्षा कमी किंमतीत या फोनला या महिन्यात लाँच करण्यात आले होते. फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप, स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर, अमोलेड डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंग यासारखे फीचर्स दिले आहेत.

वाचाः

ची किंमत
रियलमी ७ प्रो स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये येतो. या फोनच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडलची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. तर 8GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडलची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. फोन दोन कलर्समध्ये मिरर ब्लू आणि मिरर सिल्वर मध्ये येतो.

वाचाः

फोनचे खास वैशिष्ट्ये
स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.8 टक्के आणि रेजॉलूशन 1080×2400 पिक्सल आहे. यात ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4500mAh बॅटरी दिली आहे. ६५ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करते. हा फोन अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्मटवर काम करतो.

वाचाः

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा (सोनी IMX682) चा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा मोनोक्रोम आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियलमीच्या या फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here