नवी दिल्लीः BSNL आपल्या ग्राहकांना खास भेट देत आहे. या ऑफर अंतर्गत कंपनी वर्क फ्रॉम होम ब्रॉडब्रँड प्लानला ग्राहक फ्रीमध्ये वापर करू शकतात. यात युजर्संना 10Mbps सोबत हायस्पीड 5GB डेटा रोज मिळणार आहे. कंपनीने सांगितले की, ही ऑफर खास करुन बीएसएनएलच्या लँडलाइन युजर्ससाठी आहे. जे सध्या फ्री ब्रॉडबँड कनेक्शनचा लाभ घेवू शकतील. असे करून कंपनी आपल्या लँडलाइन युजर्संना ब्रँड प्लानमध्ये मायग्रेट करु पाहते.

वाचाः

८ डिसेंबर पर्यंत ऑफर वैध
बीएसएनएलने या प्लानची सुरुवात मार्च महिन्यात केली होती. सुरवातीला याची वैधता १९ एप्रिल पर्यंत होती. त्यानंतर ती अनेकदा वाढवली गेली. आता या ऑफरची वैधता ८ डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. ऑफर अंतर्गत बीएसएनएलच्या लँडलाइन युजर्सला विना कोणत्याही अतिरिक्त शुल्कच्या बेसिक ब्रॉडबँड कनेक्शन दिले जावू शकते.

वाचाः

ग्राहकांना ८ डिसेंबर पर्यंत कोणत्याही प्रकारचे इन्स्टॉलेशन चार्ज द्यावे लागणार नाही. यात युजर्संना रोज ५ जीबी डेटा 10 Mbps च्या स्पीडने दिला जाईल. लिमिट संपल्यानंतर ही स्पीड कमी होवून 1 Mbps होईल. या ऑफरचा लाभ केवळ तेच लँडलाइन युजर्स घेवू शकतील ज्यांच्याकडे कोणताही अॅक्टिव ब्रॉडबँड कनेक्शन नाही. युजर्सला केवळ ३० दिवसांसाठी ही फ्री सुविधा दिली जाणार आहे.

वाचाः

सर्व सर्कल्समध्ये लागू
कंपनीची ही ऑफर केवळ अंदमान-निकोबार सर्कलला सोडून बाकीच्या सर्व सर्कल्समध्ये उपलब्ध आहे. बीएसएनएल लँडलाइन सब्सक्रायबर्स हा नवीन ब्रॉडब्रँड प्लान टोल फ्री नंबर 1800-345-1504 वर कॉल करून मिळवू शकतात.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here