वाचाः
Samsung Galaxy M01s च्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत आता ९९९९ रुपयांऐवजी ९ हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. तसेच Samsung Galaxy M01 Core च्या १ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५ हजार ४९९ रुपयांऐवजी ४ हजार ९९९ रुपये झाली आहे. तर च्या २ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत ६ हजार ४९९ रुपयांऐवजी ५ हजार ९९९ रुपये झाली आहे.
वाचाः
Samsung Galaxy M01sची वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ६.२ इंचाचा HD+ TFT इनफिनिटी-V डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच सोबत आहे. फोनमध्ये MediaTek Helio P22 चिपसेट दिला आहे. यात ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकतो. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचा ड्यूल कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000mAh बॅटरी दिली आहे.
वाचाः
Samsung Galaxy M01 Coreचे वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ५.३ इंचाचा HD+ TFT डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये MediaTek MT6739 प्रोसेसर दिला आहे. २ जीबी रॅम आणि ३२ जीबी पर्यंत स्टोरेजच्या या फोनमध्ये अँड्रॉयड 10 Go Edition दिले आहे. स्वस्त फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 3000mAh बॅटरी दिली आहे.
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times