नवी दिल्लीः आजपासून सुरू होत असलेल्या मध्ये पहिला सामना आज सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटाने सुरू होत आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. जर तुम्हाला आयपीएल फ्रीमध्ये पाहायची असेल तर रिलायन्स कंपनी अनेक बेस्ट प्लान ऑफर करीत आहे. ज्यात Disney+ Hotstar VIP सब्सक्रिप्शन फ्री मध्ये मिळतो.

रिलायन्स जिओचा ४९९ रुपयांचा प्लान
भारताची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जियोच्या यादीत खूप प्लान आहेत. ज्यात Disney+ Hotstar VIP चे फ्री सब्सक्रिप्शन युजर्संना देते. तसेच फ्रीमध्ये आयपीएल पाहता येवू शकते. काही दिवसाआधी कंपनीने क्रिकेट कॅटेगरीत एक प्लान लाँच केला होता. जिओ क्रिकेट पॅकची किंमत ४९९ रुपये आहे. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. तसेच या प्लानमध्ये वर्षभरासाठी Disney+ Hotstar VIP चे कॉम्प्लिमेंटरी सब्सक्रिप्शन मिळते.

जिओचा ७७७ रुपयांचा प्लान
या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. यात रोज १.५ जीबी डेटा शिवाय ५ जीबी बोनस डेटा मिळतो. जिओ ते जिओ वर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग शिवाय नॉन जिओ नेटवर्क्सवर कॉलिंगसाठी 3000FUP मिनट मिळते. तसेच या प्लानममध्ये रोज १०० फ्री एसएमएस आणि Disney+ Hotstar VIP चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. प्लानमध्ये जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन सुद्धा ८४ दिवसांसाठी मिळते.

एअरटेलचा ५९९ रुपयांचा प्लान
आयपीएल फ्रीमध्ये पाहण्यासाठी हा प्लान सुद्धा बेस्ट आहे. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. रोज २ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० फ्री एसएमएस मिळतात. एअरटेलचा हा प्ला Disney+ Hotstar VIP के OTT बेनिफिट सोबत येतो. एका वर्षासाठी अॅपचे सब्सक्रिप्शन मिळते.

एअरटेलचा २६९८ रुपयांचा प्लान
एअरटेलचा हा दुसरा प्लान आहे. ज्यात आयपीएल फ्रीमध्ये पाहता येवू शकते. २६९८ रुपयांच्या प्लानमध्ये २ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. या प्लानची वैधता वर्षभरासाठी आहे. सर्व नेटवर्क्सवर फ्री व्हाईस कॉलिंग मिळते. रोज १०० फ्री एसएमएस मिळते. या प्लानमध्ये Disney+ Hotstar VIP चे वर्षभरासाठी सब्सक्रिप्शन मिळते.

या बातम्या वाचा

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here