नवी दिल्लीः मागच्या सेलमध्ये रेडमीचा जबरदस्त एन्ट्री लेवल स्मार्टफोन खरेदी करता आला नसेल तर आज ही तुमच्यासाठी संधी आहे. हा फोन आज दुपारी १२ वाजता अॅमेझॉन इंडिया आणि वर सेलसाठी उपलब्ध होणार आहे. या फोनची किंमत ७ हजारांपेक्षा कमी आहे. या स्मार्टफोनमध्ये दमदार मीडियाटेक हीलियो प्रोसेसर यासारखे बेस्ट इन क्लास फीचर दिले आहे.

वाचाः

किंमत आणि ऑफर
रेडमी ९ए मिडनाइट ब्लॅक, नेचर ग्रीन, आणि सी ब्लू कलर ऑप्शन मध्ये येते. याच्या २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इंटरनल स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ६ हजार ७९९ रुपये आहे. तर ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. आजच्या सेलमध्ये खास ऑफर दिली जात आहे. बँक ऑफ बडोदा च्या क्रेडिट कार्डवरून ईएमआय ट्रान्झॅक्शन वर हा फोन खरेदी केल्यास तात्काळ ५ टक्के डिस्काउंट मिळणार आहे. अॅमेझॉन पे यूपीआयवरून पेमेंट केल्यास १० टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

वाचाः

रेडमी ९ए चे वैशिष्ट्ये
फोनमध्ये 720×1600 पिक्सल रेजॉलूशन दिला आहे. फोनमध्ये ६.५३ इंचाचा एचडी प्लस एलसीडी डॉट ड्रॉप डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. ड्यूल नॅनो सिम सपोर्टच्या फोनमध्ये ३ जीबी रॅमसोबत मीडियाटेक हीलियो G25 SoC प्रोसेसर मिळणार आहे. फोनमध्ये ३२ जीबी इंटरनल मेमरी मिळते. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते.

वाचाः

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये १२ मेगापिक्सल रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनचा फ्रंट कॅमेरा वॉटरड्रॉप नॉच मध्ये दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here