नवी दिल्लीः ने मंगळवारी आपल्या पोस्टपेड युजर्ससाठी नवीन सर्विसेज आणि प्लान्स लाँच केले आहेत. कंपनी ने Jio Postpaid Plus, Postpaid ऑफर्सची घोषणा केली आहे. जिओच्या या प्लान्समध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिज्नी प्लस हॉटस्टार, फॅमिली प्लान आणि डेटा रोलओव्हर, फ्री इंटरनॅशनल रोमिंग, सिमची फ्री होम डिलिवरी आणि अॅक्टिवेशन तसचे कोणत्याही डाउनपेमेंटसाठी आपल्या जिओ नंबरला पोस्टपेड नंबर स्विच करण्याची ऑफर्स दिले जात आहे. जिओने ३९९ रुपये, ५९९ रुपये, ७९९ रुपये आणि १४९९ रुपयांचे पाच नवीन प्लान आणले आहेत.

वाचाः

जिओने एक प्रेस रिलिज पाठवून JioPostPaid Plus लाँचिंगची माहिती दिली आहे. ही सर्विस देशभरातील पोस्टपेड युजर्संसाठी सुपीरियर अनुभव मिळणार आहे. जिओ पोस्ट पेड प्लस मध्ये युजर्संना नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम आणि डिज्नी प्लस हॉटस्टार यासारख्या अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. पोस्टपेड प्लान अंतर्गत फीचर्स प्लस मध्ये युजर्संना २५० रुपयांचे कनेक्शन हिशोबाप्रमाणे कुटुंबासाठी फॅमिली प्लान निवड करू शकतात. ५०० जीबी पर्यंत रोलओवरची सुविधा मिळते. भारत आणि विदेशात वाय फाय कॉलिंग दिली जात आहे.

वाचाः

International Plus अंतर्गत विदेश प्रवास करणाऱ्या भारतीय युजर्संना इन फ्लाइट कनेक्टिविटी मिळणार आहे. यूएईमध्ये फ्री इंटरनॅशनल रोमिंग, इंटरनॅशनल रोमिंग दरम्यान १ रुपयात भारतात कॉल व ५० पैसे प्रति मिनिट दराने इंटरनॅशनल कॉलिंग ऑफर दिली जात आहे.

कंपनीने Experience Plus अंतर्गत ग्राहकांना जिओवर सध्याच्या क्रेडिटला कायम ठेवले आहे. जिओ नंबरला पोस्टपेड वर स्विच करू शकता. या दरम्यान कोणतेही डाऊनपेमेंट नाही. जिओ ग्राहकांना सिम कार्डची फ्री होम डिलिवरी आणि अॅक्टिवेशन ऑफर करीत आहे.

वाचाः

३९९ रुपयांचा जिओ प्लान
जिओच्या या प्लानमध्ये ७५ जीबी हाय स्पीड डेटासोबत अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग व एसएमएस बेनिफिट दिला जात आहे. डेटा रोलओवर फॅसिलिट २ जीबी आहे.

५९९ रुपयांचा जिओ प्लान
जिओच्या या प्लानमध्ये १०० जीबी डेटा मिळणार आहे. अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग व एसएमएसची सुविधा दिली जाते. डेटा रोलओवर सुविधा २०० जीबी आहे. या फॅमिली प्लानसोबत कंपनी १ अतिरिक्त सिम कार्ड सुद्धा देत आहे.

वाचाः

७९९ रुपयांचा जिओ प्लान
जिओच्या या प्लानमध्ये १५० जीबी डेटा दिला जातो. अनलिमिटेड कॉलिंग व एसएमएसचा फायदा ग्राहकांना मिळतो. या प्लानमध्ये २०० जीबी डेटा रोलओवहर फॅसिलिटी आहे. या फॅमिली प्लानसोबत २ अतिरिक्त सिम कार्ड मिळणार आहे.

९९९ रुपयांचा जिओ प्लान
जिओच्या या प्लानमध्ये २०० जीबी डेटा मिळणार आहे. या शिवाय अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग व एसएमएसची सुविधा मिळते. ग्राहकांना या प्लानमध्ये ५०० जीबी डेटा रोलओवरची सुविधा दिली जाते. फॅमिली प्लानसोबत ३ अतिरिक्त सिम कार्ड सुद्धा या प्लानमध्ये मिळणार आहे.

वाचाः

१४९९ रुपयांचा जिओ प्लान
जिओच्या या प्लानमध्ये ३०० जीबी डेटा दिला जातो. अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग व एसएमएस दिले जाते. डेटा रोलओवरची सुविधा ५०० जीबी आहे. या प्लानसोबत जिओ अमेरिका आमि यूएई मध्ये अनलिमिटेड डेटा, व्हाइस कॉलिंग ऑफर करीत आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here