वाचाः
AMOLED स्क्रीन आणि स्टेनलेस स्टील बॉडी
46mm च्या वॉच मध्ये 454×454 पिक्सल रेजॉलूशन सोबत 1.39 इंचाचे AMOLED डिस्प्ले दिले आहे. वॉचच्या ४२ एमएमच्या व्हेरियंटमध्ये 390×390 पिक्सल रेजॉलूशन सोबत 1.19 इंचाची AMOLED स्क्रीन मिळणार आहे. बिल्ड क्वॉलिटीत खास सेरेमिक तयार करण्यात आले आहे.
वाचाः
६ सेन्सर आणि ११ फिटनेस मोड
विवो वॉच ६ बिल्ट इन सेन्सर सोबत येते. यात ब्लड ऑक्सिजन, अॅक्सेलरोमीटर, एयर प्रेशर, जियोमॅग्नेटिज्म, अॅम्बियंट लाइट आणि पोझिशनिंग सेंसरचा समावेश आहे. तर स्पोर्ट्स आणि फिटनेस ट्रॅकिंग साठी या वॉचमध्ये आउटडोर रनिंग, स्विमिंग, सायकलिंग यासारखे ११ मोड मिळतात.
वाचाः
९ दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ
विवोच्या या वॉचमध्ये म्युझिक प्लेबॅक, NFC ट्रॅफिक कार्ड, ऐक्सेस कार्ड आणि JOVI वॉइस असिस्टेंटचा सपोर्ट दिले आहे. वॉचच्या 46mm वेरियंट मध्ये 18 दिवसांपर्यंत आणि 42mm च्या व्हेरियंटमध्ये ९ दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ मिळते. भारतात ही स्मार्टवॉच कधीपर्यंत लाँच करणार याविषयी कंपनीने अद्याप काही स्पष्ट केले नाही.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times