नवी दिल्लीः स्मार्टफोनची प्रतीक्षा संपणार आहे. HMD Global ने मंगळवारी या फोनच्या सेलची घोषणा केली आहे. नोकियाच्या या लेटेस्ट स्मार्टफोनची ग्लोबल अॅव्हरेज किंमत ५९९ यूरो म्हणजेच ५१ हजार ७०० रुपये आहे. फोनसोबत कंपनी ६ महिन्यासाठी गुगल वनचे फ्री ट्रायल सुद्धा ऑफर करीत आहे.

वाचाः

कंपनीने या फोनला या वर्षीच्या मार्च महिन्यात शोकेस केले होते. त्यानंतर युजर्सला फोनची मोठी प्रतीक्षा होती. फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात 600MHz ते 3.8GHz दरम्यान सर्वात जास्त नवीन ५ जी रेडियो बँड्स मिळणार आहेत.

वाचाः

नोकिया 8.3 5G चे वैशिष्ट्ये
फोनमध्ये ६.८१ इंचाचा फुल एचडी प्लस प्योर डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 1080×2400 पिक्सल रेजॉलूशन दिला आहे. हा फोन दोन व्हेरियंटमध्ये ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजमध्ये येतो. मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट येणाऱ्या या फोनमध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर मिळणार आहे. हा फोन अँड्रॉयड १० ओएसवर काम करतो.

वाचाः

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरासोबत एक १२ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. तर सेल्फीसाठी या फोनध्ये २४ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे.

वाचाः

फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500mAh बॅटरी दिली आहे. जो १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 3.5 mm हेडफोन जॅक सोबत वायफाय 802.11 a/b/g/n/ac, ब्लूटूथ 5.0, NFC, यूएसबी टाइप-C पोर्ट यासारखे ऑप्शन मिळणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here