नवी दिल्लीः शाओमीचा स्वस्त स्मार्टफोन रेडमी 9i चा आज दुपारी १२ वाजता सेल आयोजित करण्यात आला आहे. ऑनलाइन शॉापिंग वेबसाइट फ्लिपकार्ट आणि कंपनीची वेबसाईट वरून हा फोन खरेदी करता येवू शकतो. हा स्मार्टफोन याच महिन्याच्या सुरुवातीला लाँच केला होता. १० हजारांपेक्षा कमी किंमतीत असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी, ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज यासारखे फीचर्स दिले आहेत.

वाचाः

फोनची किंमत
स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये येतो. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ८ हजार २९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९ हजार २९९ रुपये आहे. फोन तीन कलर ऑप्शन मिडनाइट ब्लॅक, सी ब्लू आणि नेचर ग्रीन मध्ये येतो.

वाचाः

Redmi 9i चे वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा एचडीप्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720×1,600 पिक्सल आहे. यात ड्यूल सिम स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर मीडियाटेक हीलियो G25 प्रोसेसर, ४ जीबी रॅम सोबत ६४ जीबी स्टोरेज आणि १२८ जीबी स्टोरेजचा पर्याय मिळतो. फोनचा स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढतवता येवू शकतो. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे. तसेच १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

वाचाः

फोटोग्राफीसाठी यात सिंगल रियर आणि सिंगल फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. कनेक्टिविटीसाठी यात 4जी, VoWiFi, VoLTE, ब्लूटूथ, जीपीएस आणि मायक्रो-यूएसबी पोर्ट सारखे फीचर दिले आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here