वाचाः
या स्मार्टफोनची विक्री ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर केली जाणार आहे. फ्लिपकार्टवर सॅमसंग गॅलेक्सी एफ ४१ चा एक डेडिकेटेड पेज लाइव करण्यात आले आहे. तर लाँचिंग तारीख आणि फोनचे काही माहिती दिली आहे. कंपनीने आपल्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म्सवर याचा एक टीझर जारी केला आहे. स्मार्टफोनची लाँचिंग ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता होणार आहे.
वाचाः
6000mAh ची बॅटरी आणि तीन रियर कॅमेरे
फ्लिपकार्टवर पेजवर फोनचे काही फीचर्सचा खुलासा करण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एफ ४१ स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी दिली आहे. तसेच सुपर अमोलेड इनफिनिटी यू डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये पुढच्या बाजुला वॉटरड्रॉप नॉच पाहायला मिळू शकतो. यात फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. तसेच रियर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात येणार आहे.
वाचाः
फोनची संभावित किंमत
टिप्स्टर इशान अग्रवालच्या माहितीनुसार, फोन तीन कलर ऑप्शन मध्ये ब्लॅक, ब्लू, आणि ग्रीनमध्ये येईल. यात ऑक्टाकोर Exynos 9611 प्रोसेसर आणि ६ जीबी रॅम मिळू शकतो. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो. या फोनची किंमत २० हजारांपेक्षा कमी असू शकते.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times