नवी दिल्लीः टेक कंपनी विवोच्या V20 सीरीज मध्ये आणखी एक नवीन फोन चा समावेश करण्यात आला आहे. या फोनला आणि नंतर अफॉर्डेबल मॉडल म्हणून लाँच करण्यात आले आहे. कंपनी नवीन विवो व्ही २० सीरीज याच आठवड्यात घेऊन आली होती. आता नवीन एसई मॉडल दमदार फीचर्ससोबत लाँच करण्यात आली आहे. फोनमध्ये वॉटरड्रॉप स्टाइल डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. हा ३३ वॉट फास्ट चार्जिंग ऑफर करतो. तसेच ३डी डिझाइन बॅकसोबत येतो.

वाचाः

Vivo V20 SE ची किंमत
कंपनी नवीन Vivo V20 SE ला मलेशियात 1,199 MYR (जवळपास 21,300 रुपये) च्या किंमतीत आणले आहे. ही किंमत ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची आहे. विवोचा नवीन फोन ग्रेविटी ब्लॅक आणि ऑक्सीजन ब्लू कलरच्या पर्यायात येतो. सध्या केवळ मलेशिया मार्केटमध्ये खरेदी करता येवू शकतो. हा फोन Lazada Malaysia वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे.

वाचाः

Vivo V20 SE चे वैशिष्ट्ये
स्मार्टफोनमध्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. 1080×2400 पिक्सल्स रेजॉलूशन आणि 20:9 आस्पेक्ट रेशियो सोबत येतो. दमदार परफॉर्मन्स साठी या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर दिला आहे. यात ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज दिला आहे. अँड्रॉयड १० सोबत येणाऱ्या या फोनमध्ये कंपनीचे कस्टम Funtouch OS 11 दिले आहे.

वाचाः

या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सरचा ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. तसेच मॉड्यूल मध्ये ८ मेगापिक्सलचा सेकंडरी वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा तिसरा लेन्स बोकेह इफेक्ट साठी समावेश करण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ साठी यात ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4100mAh बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here