नवी दिल्लीः वोडाफोन – आयडिया अर्थात नवीन ने आपल्या युजर्संसाठी १ जीबी डेटा फ्री देत आहे. या डेटाचा वापर एका आठवड्यासाठी केला जावू शकतो. कंपनी लागोपाठ युजर्स गमावत आहे. ग्राहकांना आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी कंपनी फ्री डेटा देत आहे.

वाचाः

कुणाला मिळतोय फ्री डेटा
टेलिकॉम टॉक रिपोर्टच्या माहितीनुसार, कंपनी प्रमोशनल ऑफर अंतर्गत आपल्या ग्राहकांना फ्रीमध्ये १ जीबी डेटा देत आहे. फ्री डेटाची वैधता ७ दिवसांची आहे. जर युजर्स एका आठवड्यात या डेटाचा वापर करीत नसेल तर हा डेटा आपोपाप संपून जाईल. परंतु, हा फ्री डेटा सर्वांसाठी नसून काही निवडक ग्राहकांना दिला जात आहे. ज्या युजर्संना डेटा दिला जात आहे. त्यांना एसएमएस पाठवून सांगितले जात आहे.

वाचाः

असे करा चेक
तुम्हाला फ्री डेटा मिळाला आहे की नाही, हे चेक करण्यासाठी व्हीआयच्या अॅपमध्ये लॉगिन केल्यानंतर अॅक्टिव पॅक्सच्या डिटेल्समध्ये जा. त्या ठिकाणी डाटा पॅक्समध्ये माहिती करून घ्या. फ्री डेटा मिळाला की नाही.

वाचाः

४८.२ लाख युजर्सचे नुकसान
रिलायन्स जिओ लागोपाठ नवीन ग्राहक जोडत आहे. एअरटेल आणि वोडाफोन यासारख्या कंपन्या युजर्स गमावत आहेत. जून २०२० मध्ये रिलायन्स जिओने जवळपास ४५ लाख नवीन युजर्स जोडले आहे. तर दुसरीकडे एअरटेलने ११.२ लाख आणि वोडाफोन आयडियाने ४८.२ लाख युजर्स गमावले आहेत. या प्रमाणे ३९.७ कोटी युजरबेस सोबत रिलायन्स जिओ टॉपवर कायम आहे. तर ३१.६ कोटी युजरबेस सोबत एअरटेल दुसऱ्या आणि ३०.५ कोटी सब्सक्रायबर्स सोबत वोडाफोन आयडिया तिसऱ्या स्थानावर आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here