नवी दिल्लीः महागडा स्मार्टफोन म्हटला तर सर्वात आधी आयफोनच्या टॉप अँड व्हेरियंट समोर येतो. मार्केटमध्ये आता एक अशा स्मार्टफोनची एन्ट्री झाली आहे. याच्या किंमतीत कमीत कमी तीन iPhone 11 Pro Max खरेदी करता येवू शकतील. या स्मार्टफोनचे नाव आहे. याची किंमत ४४०० अमेरिकी डॉलर म्हणजेच ३ लाख २४ हजार ५०० रुपये आहे. तर फोनच्या टॉप अँड व्हेरियंटची किंमत ५ लाख रुपये आहे.

वाचाः

३ लाखांपेक्षा जास्त किंमतीचा फोन
8848 एक चायनीज लग्झरी स्मार्टफोन ब्रँड आहे. याला नुकतेच एम६ लग्झरी स्मार्टफोनच्या किंमतीत लाँच केले आहे. फोन तीन व्हेरियंटमध्ये येतो. यात पहिले नाव Vermilion Cowhide or Azurite Leatherचे आहे. हा फोन १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजसोबत येतो. याची डिझाईन गोल्ड प्लेटेड टायटेनियम अलॉयचा वापर करण्यात आला आहे. यासोबत याला खास लूक देण्यासाठी नॅचरल डायमंड आणि येलो सफायर सिंथेटिक रूबीचा टच दिला आहे. या फोनची किंमत ४४०० डॉलर म्हणजेच ३ लाख २४ हजार ५०० रुपये आहे.

वाचाः

या व्हेरियंटची किंमत ४ लाख रुपये
फोनचे दुसरे व्हेरियंट Blue Dragon Lizard Skin आहे. याची किंमत ५२७४ डॉलर म्हणजेच ३ लाख ८९ हजार रुपये आहे. याच्या डिझाईनमध्ये गोल्ड प्लेटेड टायटेनियम अलॉयडचा वापर करण्यात आला आहे. फोनचे व्हेरियंट १ टीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत येते.

वाचाः

क्रोकोडायल लेदर व्हेरियंटची किंमत ४.८६ लाख रुपये
8848 M6 प्राइवेट कस्टमाइज्ड ड्रॅगन लिमिटेड एडिशन सर्वात महाग व्हेरियंट Basalt Crocodile Leather आहे. याची किंमत ६६०० डॉलर म्हणजेच ४ लाख ८६ हजार ६०० रुपये किंमत आहे. हा फोन १२ जीबी रॅम आणि १ टीबी इंटरनल स्टोरेज सोबत येतो.

वाचाः

फोनमध्ये मिळणारे अन्य फीचर्स
फोनमध्ये ६.०१ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ एसओसी प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात ६४ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी याफोनमध्ये १६ मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. हा फोन अँड्रॉयड १० आउट ऑफ द बॉक्सवर काम करतो. या फोनला पॉवर देण्यासाठी 4,380mAh बॅटरी दिली आहे. २७ वॉट वायरलेस आणि १० वॉटची वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here