नवी दिल्लीः टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही महिन्यापासून मोठा बदल करण्यात आला आहे. या नवीन बदलामुळे स्वस्तात मिळणारे इंटरनेट आता महाग झाले आहेत. व्होडाफोन-आयडिया सह रिलायन्स जिओने डिसेंबर २०१९ पासून आपल्या प्रीपेड प्लानचे दर महाग केले आहेत. टॅरिफ महाग झाल्यानंतरही काही कंपन्यांनी ग्राहकांना खूश करण्यासाठी तसेच त्यांना इंटरनेट महाग झाल्याची झळ बसू नये यासाठी नव्या ऑफर्स बाजारात आणल्या आहेत.

टॅरिफ वाढल्यानंतरही व्होडाफोन, आयडिया ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंग दिली जात आहे. तर जिओने केवळ आपल्या नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग देऊ केली आहे. ग्राहकांचा दररोज हा प्लान सर्वात आवडता प्लान आहे. एअरटेलच्या १.५ जीबी डेटा प्लानच्या वैधता २८ दिवस ते ३६५ दिवस इतकी आहे. यात २४९ रुपये (२८ दिवस वैधता), ३९९९ रुपये (५६ दिवस वैधता), ५५५ रुपये (८४ दिवस वैधता), आणि २,३९८ रुपये (३६५ दिवस वैधता) हे प्लान आहेत. या सर्व प्लानवर अनलिमिटेड फ्री व्हाईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतो.

व्होडाफोनच्या १.५ जीबी डेटाचे प्लान २८ दिवस ते ३६५ दिवसांची वैधता आहे. या ऑफरमध्ये २४९ रुपये (२८ दिवस वैधता), ३९९ रुपये (५६ दिवस वैधता), ५५५ रुपये (७० दिवस वैधता), ५९९ रुपये (८४ दिवस वैधता) आणि २३९९ रुपये (३६५ दिवस वैधता), या प्लानचा समावेश आहे. रिलायन्स जिओच्या ग्राहकांना १.५ जीबी डेटाचे चार प्लान आहेत. १९९ रुपये, ३९९ रुपये, ५५५ रुपये, २,०२० रुपयांची ऑफर आहे. या सर्व प्लानवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग सह १०० एसएमएस ऑफर आहे. दुसऱ्या नेटवर्क्सवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये फ्री मिनिट्स मिळतात. २८ दिवसांच्या वैधतेसह १९९ रुपये च्या प्लानमध्ये नॉन जिओ नेटवर्कवर कॉलिंगसाठी १००० मिनिट मिळतात. तर ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये ५६ दिवसांच्या वैधतेसह २००० मिनिट मिळतात. ५५५ रुपयांच्या प्लानमध्ये ८४ दिवसासाठी ३००० नॉन जिओ कॉलिंग मिनिट्स मिळतात.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here