नवी दिल्लीः देशातील ऑनलाइन कंपन्या आता आपल्या प्लेटफॉर्मवरून २ हजार रुपयांपर्यंत पेमेंट साठी वन टाइम पासवर्ड म्हणजेच ओटीपी रद्द करणार आहे. कंपन्यांच्या या निर्णयानंतर करणे खूपच सोपे होणार आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टने यासाठी सर्वात आधी पुढाकार घेतला आहे.

फ्लिपकार्टवर २,००० रुपयांपर्यंत ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करण्यासाठी आता ओटीपीची गरज राहिलेली नाही. फ्लिपकार्ट नंतर आता स्विगी, ओला व उबर या सारख्या कंपन्या सुद्धा ओटीपी हटवण्यासाठी तयार होत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑनलाइन पेमेंट सोपे करण्यासाठी देशातील बँकांना ओटीपी ऑथेंटिकेशन हटवण्यासाठी मंजुरी दिली होती. तर दुसरीकडे पेटीएमचे उपाध्यक्ष पुनीत जैन म्हणाले होते की, आमची कंपनी विना ओटीपी क्रेडिट कार्डवरून पेमेंट घेण्याची तयारी करीत आहे. परंतु, कंपनीने अद्याप याची माहिती दिली नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्याच्या घडीला मार्केटमध्ये ४० टक्के ट्रान्झक्शन पेटीएमवरून होत आहेत. आयआरसीटीसी ते लाइफस्टाइल अॅप्स पर्यंत पेमेंट करण्यासाठी पेटीएमचा सर्वात मोठा वापर केला जात आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here