वाचाः
फोनची किंमत
Mi 10T दोन व्हेरियंटमध्ये येते. याच्या 6GB + 128GB व्हेरियंटची किंमत 499 यूरो (जवळपास 43,000 रुपये) आणि 8GB + 128GB व्हेरियंट ची किंमत 549 यूरो (जवळपास 47,200 रुपये) आहे. याच प्रमाणे Mi 10T Pro च्या 8GB + 128GB व्हेरियंटची किंमत 599 यूरो (जवळपास 51,700 रुपये), 8GB + 256GB व्हेरियंटची किंमत 649 यूरो (जवळपास 56,000 रुपये) आहे. तर, Mi 10T च्या 6GB + 64GB व्हेरियंटची किंमत 279 यूरो (जवळपास 24,000 रुपये) आणि 6GB + 128GB व्हेरियंटची किंमत 329 यूरो (जवळपास 28,300 रुपये) आहे.
वाचाः
Mi 10T आणि Mi 10T Pro चे वैशिष्ट्ये
दोन्ही स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी (1080×2440 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे. दोन्ही फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर, 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.
वाचाः
Mi 10T च्या रियरमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स दिला आहे. तर Mi 10T Pro च्या रियरमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिले आहे.
वाचाः
Mi 10T Lite
या फोनमध्ये सुद्धा ६.६७ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये 4,820mAh ची बॅटरी दिली आहे. जी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सरचा क्वॉड कॅमेरा दिला आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times