नवी दिल्लीः ला आफ्रिकेत लाँच करण्यात आले आहे. सॅमसंगचा हा फोन अँड्रॉयड गो एडिशन सोबत येतो. यात गुगल गो एडिशन अॅप्स इन्स्टॉल येतात. सॅमसंगचा हा नवीन एन्ट्री लेवल स्मार्टफोन मागच्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या गॅलेक्सी ए २ कोर चे अपग्रेड व्हेरियंट आहे. फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी दिली आहे.

वाचाः

Samsung Galaxy A3 Core ची किंमत
Samsung Nigeria च्या ट्विटर हँडलच्या माहितीनुसार, गॅलेक्सी ए३ कोर 32,500 NGN (जवळपास ६ हजार २०० रुपये) खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. फोनला नायजेरियात सॅमसंग स्टोर्स आणि पार्टनर स्टोर्सवर खरेदी करता येवू शकतो. हा फोन ब्लू, रेड आणि ब्लॅक कलरमध्ये येतो.

वाचाः

फोनची वैशिष्ट्ये
ड्यूल सिमच्या या फोनमध्ये ५.३ इंचाचा एचडी प्लस (720×1480 पिक्सल) टीएफटी एलसीडी डिस्प्ले आहे. फोनमध्ये वरच्या भागात व खालच्या भागात मोठे बेजल दिले आहेत. हँडसेटमध्ये क्वॉड कोर प्रोसेसर दिला आहे. परंतु, कंपनीने अद्याप या प्रोसेसरचे नाव जाहीर केले नाही. या फोनमध्ये १ जीबी रॅम प्लस १६ जीबी स्टोरेज दिला आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते.

वाचाः

सॅमसंगचा हा फोन अँड्रॉयड गोवर चालतो. यात गुगल गो एडिशन अॅप्स आधीच इन्स्टॉल करण्यात आले आहेत. या फोनध्ये ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. रियर कॅमेरा एलईडी फ्लॅश सोबत येतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर दिला आहे. सॅमसंगचा दावा आहे की, रियर कॅमेरा ४ एक्स पर्यंत डिजिटल झूमसोबत येतो. तसेच ३० फ्रेम प्रति सेकंदावर फुल एचडी व्हिडिओ रेकॉर्ड करू शकते.

वाचाः

सॅमसंगच्या या फोनमध्ये रियर टेक्स्चरयुक्त पॉलीकॉर्बोनेटचे बटन दिले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 3000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये वायफाय, यूएसबी चार्जिंग सपोर्ट करते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here