नवी दिल्लीः एअरटेलने आपल्या ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान देशभरातील युजर्ससाठी जारी केला आहे. याआधी एअरटेलचा हा प्लान काही निवडक सर्कलमध्ये उपलब्ध होता. जिओने नुकताच ३९९ रुपयांचा जिओ पोस्टपेड प्लस प्लान लाँच केला होता. वोडाफोन आयडियाकडे ३९९ रुपये प्रति महिना असलेला एक पोस्टपेड प्लान उपलब्ध आहे. या तिन्ही कंपन्या ३९९ रुपयाच्या पोस्टपेड प्लानमध्ये काय ऑफर करीत आहेत जाणून घ्या.

वाचाः

३९९ रुपयांचा जिओ पोस्टपेड प्लान
जिओने ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान गेल्या महिन्यात ‘Jio Postpaid Plus’ अंतर्गत लाँच केला आहे. या प्लानमध्ये कंपनी ७५ जीबी डेटा देत आहे. हा डेटा संपल्यानंतर १० रुपये प्रति जीबी या प्रमाणे चार्ज द्यावा लागतो. या प्लानमध्ये २०० जीबी डेटा रोलओवरची सुविधा दिली जाते. जिओच्या या प्लानध्ये एसएमएस आणि कॉलिंग अनलिमिटेड दिली जाते. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन सुद्धा या प्लानमध्ये दिले जाते. तसेच कंपनी नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम आणि डिज्नी हॉटस्टार व्हीआयपीची मेंबरशीप फ्री मध्ये ऑफर करते.

वाचाः

३९९ रुपयांचा वोडाफोन-आयडिया पोस्टपेड प्लान
वोडाफोन-आयडियाचा ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लानमध्ये ४० जीबी डेटा ऑफर केला जात आहे. याशिवाय ६ महिन्यांसाठी १५० जीबी अतिरिक्त डेटा दिला जातो. ग्राहकांना या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि एसएमएस मिळतो. या प्लानमध्ये कोणताही फॅमिली आणि ओटीटी बेनिफिट दिला जात नाही.

वाचाः

३९९ रुपयांचा एअरटेल प्लान
एअरटेलच्या ३९९ रुपयांच्या प्लानला आता देशभरासाठी लागू करण्यात आले आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना ४० जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस रोज दिले जाते. एअरटेलच्या या प्लानमध्ये एकावर्षासाठी विंक म्यूझिक आणि शॉ अकेडमी सोबत एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियमचे सब्सक्रिप्शन दिले जाते. तसेच, ३९९ रुपयांच्या या प्लानमध्ये फ्री हेलोट्यून्स आणि फास्टॅग वर १५० रुपयांचा कॅशबॅक ऑफर केला जातो.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here