वाचाः
किंमत किती
रियलमी नार्जो २० दोन व्हेरियंट ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी आणि ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज मध्ये येतो. याच्या ६४ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत १० हजार ४९९ रुपये आहे. तर १२८ जीबी व्हेरियंटची किंमत ११ हजार ४९९ रुपये आहे. फोन ग्लोरी सिल्वर आणि विक्टरी ब्लू कलर ऑप्शनमध्ये येतो. रियरमी ७ प्रोच्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन मिरर ब्लू आणि मिरर व्हाइट कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे.
वाचाः
रियलमी नार्जो २० चे वैशिष्ट्ये
फोनमध्ये 720×1600 पिक्सल रेजॉलूशन दिला आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. अँड्रॉयड १० वर बेस्ड Realme UI सोबत काम करणाऱ्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G85SoC प्रोसेसर दिला आहे. ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात तीन रियर कॅमेरे दिले आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. रियलमी नार्जो २० मध्ये 6000 mAh बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करते.
वाचाः
रियलमी ७ प्रो चे वैशिष्ट्ये
८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 720G SoC प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये 1080×2400 पिक्सल रेजॉलूशन दिला आहे. फोनमध्ये ६.४ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. २५६ जीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्डचा सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये चार रियर कॅमेरे मिळते. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर, एक २ मेगापिक्सलचा सेन्सर एक २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे.
वाचाः
३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा या फोनमध्ये दिला आहे. तसेच फोनमध्ये 4500mAh बॅटरी दिली आहे. हा फोन ६५ वॉट सुपर डार्ट चार्ज फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सोबत येतो. या डिस्प्लेला फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी सर्व स्टँडर्ड ऑप्शन दिले आहेत.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times