नवी दिल्लीः विवोने आपल्या दोन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. () आणि झेड वनएक्स (Z1x) या दोन फोनची किंमत कमी करण्यात आली आहे. फोनच्या किंमतीत कपात करण्यात आल्यानंतर विवो झेड वन प्रोची किंमत १२ हजार ९९० रुपये झाली आहे. हे दोन्ही फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून आणि फ्लिपकार्टवरून खरेदी केले जाऊ शकतात.

विवो झेड वन प्रो ला गेल्यावर्षी भारतात लाँच करण्यात आले होते. ज्यावेळी हा लाँच करण्यात आला होता. त्यावेळी याचा थेट सामना सॅमसंग गॅलेक्सी एम४० आणि रेडमी नोट ७ प्रो या स्मार्टफोनसोबत होता. तर विवो झेडवनएक्स हा फोन सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आला होता. याचा सामना रियलमी एक्स या स्मार्टफोनसोबत होता. १ हजार रुपयांच्या कपातीनंतर विवो झेड वन प्रो (४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज) च्या फोनची किंमत १२ हजार ९९० रुपये झाली आहे. तर ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ९९० रुपये झाली आहे. या आधी या फोनची किंमत १४ हजार ९९० रुपये इतकी होती. विवो झेड वन एक्स या फोनची किंमत १४ हजार ९९० रुपये (४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज) तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९० रुपये इतकी झाली आहे. या फोनच्या किंमतीतही १ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे.

Vivo Z1 Pro या स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप आणि पंच होल फ्रंट कॅमेरा आहे. १६, २ आणि ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फास्ट चार्जिंगसाठी ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

19 COMMENTS

  1. Thank you for sharing your info. I really appreciate your efforts and I will be waiting for your next post thank you once again.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here