नवी दिल्लीः स्मार्टफोनला मागच्या महिन्यात देशात लाँच केले होते. गॅलेक्सी एम सीरीजच्या या फोनमध्ये 7000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आणि होल पंच डिस्प्ले दिला आहे. गॅलेक्सी एम ५१ या सीरीजचा पहिला फोन आहे. जो वन यूआय सोबत येतो. जर तुम्हाला मोठी बॅटरी असलेला फोन हवा असेल तर ही संधी तुमच्यासाठी खास आहे. अॅमेझॉनवर या हँडसेटला २ हजारांच्या सूट सोबत खरेदी करता येवू शकते.

वाचाः

Samsung ची किंमत आणि सूट
सॅमसंग गॅलेक्सी एम ५१ च्या ६ जीबी रॅम व्हेरियंटला २४ हजार ९९९ रुपयात तर ८ जीबी रॅम व्हेरियंटला २६ हजार ९९९ रुपयांत लाँच करण्यात आले होते. हा फोन अॅमेझॉन वर आता दोन हजारांच्या सूटमध्ये खरेदी करता येवू शकतो. आयसीआयसीआय बँक कार्ड द्वारे फोन खरेदी केल्यास २ हजारांची सूट मिळणार आहे. तसेच एक्सचेंज ऑफर मध्ये फोनवर एक हजारांची अतिरिक्त डिस्काउंट मिळणार आहे. सॅमसंगचा हा फोन सेलेस्टियल ब्लॅक आणि इलेक्ट्रिक ब्लू कलर मध्ये येतो. नो कॉस्ट ईएमआयवर हा फोन खरेदी करता येवू शकतो.

वाचाः

Samsung Galaxy M51
फोनची वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्र्रॅगन ७३० जी प्रोसेसर दिला आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज फोनमध्ये दिला आहे. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते.

वाचाः

फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी IMX682 सेंसर दिला आहे. तसेच १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, ५ मेगापिक्सलचा मायक्रो आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनमध्ये पुढच्या बाजुला ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 7000mAh ची बॅटरी दिली आहे. २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट सुद्धा दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here