नवी दिल्लीः () चा पहिला सेल सुरू झाला आहे. ई कॉमर्स साइट आणि रियलमीच्या अधिकृत वेबसाइटवर हा सेल सुरू करण्यात आला आहे. पहिल्याच सेलमध्ये फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आकर्षित ऑफर्स आणि डिस्काउंट दिला जात आहेत. काही दिवसांपूर्वीच हा फोन भारतात लाँच करण्यात आला होता.

कंपनीने रियलमी (Realme 5i) भारतात लाँच केला असून याची किंमत ८ हजार ९९९ रुपये इतकी आहे. हा फोन अॅक्वा ब्लू आणि फोरेस्ट ग्रीन या दोन रंगात उपलब्ध आहे. जिओ ग्राहकांनी हा फोन खरेदी केल्यास त्यांना ७ हजार ५५० रुपयांचा फायदा मिळणार आहे. तसेच मोबीक्विक वरून पेमेंट केल्यास १ हजार रुयपांचा कॅशबॅक मिळणार आहे. या फोनमध्ये ड्युअल सीम कार्ड सपोर्ट, अँड्रॉयड पाय ९.० आधारित कलर ६.०.१ देण्यात आला आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये वॉटर ड्रॉप नॉच दिला आहे. तसेच गोरिल्ला ग्लास ३ प्लसचे प्रोटेक्शन दिले आहे. फोनमध्ये क्वॉलकॉमचे ऑक्टाकोर स्नॅप ड्रॅगन ६६५ प्रोसेसर आणि ४ जीबी रॅम दिला आहे.

फोनमध्ये चार रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. पहिला कॅमेरा १२ मेगापिक्सलचा, दुसरा ८ मेगापिक्सलचा, तिसरा २ मेगापिक्सलचा तर चौथा कॅमेरा २ मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेऱ्यासोबत ४ के रेकॉर्डिंग दिली आहे. फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फास्ट चार्जिंगसाठी १० व्हॅटची चार्जिंग सपोर्ट आहे. मेमरी कार्डच्या साहायाने २५६ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येऊ शकते. फोनच्या मागे फिंगरप्रिंट सेन्सर सुद्धा देण्यात आला आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here