नवी दिल्लीः रियलमीचा लेटेस्टे मिड रेंज स्मार्टफोन Realme 7 आज सेलमध्ये खरेदी करता येवू शकतो. आज दुपारी १२ वाजता या सेलला सुरुवात होणार आहे. फ्लिपकार्ट आणि कंपनीची वेबसाइट realme.com वरून हा फोन खरेदी करता येवू शकतो. दोन रॅम आणि स्टोरेजमध्ये मिळणाऱ्या या फोनची सुरुवातीची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेरा सेटअप यासारखे जबरदस्त फीचर्स दिले आहेत. आजच्या सेलमध्ये काही जबरदस्त ऑफर्स दिले जाणार आहेत.

वाचाः

किंमत आणि ऑफर
रियलमी ७ च्या ६ जीबी प्लस ६४ जीबी व्हेरियंटची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. मिस्ट ब्लू आणि मिस्ट व्हाईट कलर ऑप्शनमध्ये येणाऱ्या फोनला अॅक्सिस बँकच्या क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. तर बिग बिलियन डेज सेलमध्ये या फोनवर १० टक्के सूट मिळणार आहे. रियलमीच्या वेबसाईटवरून या फोनला खरेदी केल्यास मोबीक्विककडून ५०० रुपयांचा मोबीक्वीक सुपर कॅश मिळणार आहे. या फोनला १६६७ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत नो कॉस्ट ईएमआयवर सुद्धा खरेदी करता येवू शकते.

वाचाः

फोनची वैशिष्ट्ये
फोनमध्ये 1080×2400 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनचा डिस्प्ले ग्लास ३ प्रोटेक्शन सोबत येतो. ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G95 SoC प्रोसेसर दिला आहे. मायक्रो एसडी कार्ड सोबत येणारा फोन अँड्रॉयड १० वर बेस्ड Realme UI वर काम करतो.

वाचाः

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तसेच ८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, एक २ मेगापिक्सलचा मोनोक्रॉम शूटर आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here