नवी दिल्लीः २०२१ मध्ये स्मार्टफोन इंडस्ट्रीसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जगातील टॉप ५ मोठ्या स्मार्टफोन कंपन्यांची ग्लोबल मार्केट पोझीशन मध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. सध्या हुवावे जगातील नंबर १ स्मार्टफोन कंपनी बनली आहे. परंतु, पुढली वर्षी हुवावेसाठी थोडे अडचणीचे दिवस राहणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, २०२१ मध्ये हुवावे ग्लोबल स्मार्टफोन मार्केटमध्ये घसरला जाणार असून तो ७ व्या क्रमांकावर जाण्याची शक्यता आहे. कारण, अमेरिकेत या कंपनीवर बंदी घालण्यात आली आहे.

वाचाः

सॅमसंग आणि अॅपल टॉपवर
डीजी टाइमच्या रिपोर्टनुसार, जे ब्रँड पुढील वर्षी टॉप ५ मध्ये राहतील. त्यात सॅमसंग, अॅपल, ओप्पो, विवो आणि शाओमीचा समावेश आहे. रिपोर्टमध्ये म्हटले की, २०२१ मध्ये सॅमसंग आणि अॅपल नंबर १ व २ च्या स्थानावर राहतील. त्यानंतर ओप्पो, विवो आणि शाओमीची शक्यता आहे. आफ्रिका आणि दक्षिण आशियात सहाव्या नंबरवर असलेल्या चायनीज ब्रँड Transsion चे ब्रँड टेक्नो, आयटेल आणि इनफिनिक्स असू शकते.

वाचाः

पुढील वर्षी वाढणार स्मार्टफोन शीपमेंट
पुढील वर्षी स्मार्टफोन इंडस्ट्री साठी चांगले असण्याची शक्यता आहे. याआधी २०१८ ते २०२० मध्ये आतापर्यंत लागोपाठ घसरण पाहायला मिळाली आहे. २०२१ मध्ये ग्लोबल स्मार्टफोन्स शिपमेंटमध्ये रेट डबल डिजिट किंवा १५ कोटी युनिट्सपर्यंत जावू शकतो.

वाचाः

५ जी टेक्नोलॉजीमुळे फायदा
स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये वाढ होण्यास ५ जी टेक्नोलॉजीचा हात असणार आहे. रिपोर्ट्च्या माहितीनुसार, मार्केटमध्ये एन्ट्री लेवल ४ जी आणि ५ जी डिव्हाइसची उपलब्धता स्मार्टफोन शिपमेंट्सला वाढवण्यास मदत करणार आहे. २०२३ पर्यंत १५० कोटी आणि २०२५ पर्यंत १७० कोटी पर्यंत पोहोचू शकते. डिजीटाइम्स रिसर्चमध्ये म्हटले की, २०२० मध्ये ५जी स्मार्टफोन्सची ग्लोबल शिपमेंट २० कोटी युनिट पर्यंत पोहोचू शकते. तर २०१५ मध्ये १२२ कोटी पर्यंत पोहचण्याची अपेक्षा आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here