प्रथमेश गायकवाड, विल्सन कॉलेज

सध्या ऑनलाइन परीक्षांचं वारं वाहत आहे. यात काही विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल्स सुरू असून काहींचे सबमिशन्स सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. याकाळात अनेक विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप नसल्याने ते मोबाइलवरून सबमिशन, प्रोजेक्ट्स करायला प्राधान्य देणार आहेत. याकाळात अनेकदा सेव्ह केलेली पीडीएफ ऐन सबमिशनच्या दिवशी शोधताना नाकीनऊ येतात, तर नोट्सची फाइल कुठे सेव्ह केली आहे हे आठवत नाही. हा सगळा गोंधळ टाळायचा असेल तर स्मार्ट फाइल मॅनेजरचा उपयोग करणं फायदेशीर ठरेल. आजकालच्या स्मार्टफोनमध्येही इनबिल्ट फाइल मॅनेजर्स उपलब्ध असतात. पण, ते वापरणं कठिण असल्यानं अनेकदा त्यात वेळेवर फाइल्स मिळत नाहीत. यासाठी आज काही युजरफ्रेंडली फाइल मॅनेजर्सची माहिती मिळवू या.

वाचाः

फाइल्स बाय गुगल

हे अॅप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. या अॅपमध्ये तुम्ही ब्राऊज या ऑप्शनवर क्लिक केल्यास तिथे फाइल्स सर्च करून त्या कॉपी किंवा मूव्ह करता येतात. या अॅपचे आयकॉन इतर अॅपच्या तुलनेनं मोठे असल्यानं तुम्हाला हवी असणारी फाइल पटकन रिव्ह्यू (review) करू शकतो. तसंच या अॅपमध्ये आपल्याला फाइल्स क्लीन करण्याची आणि ऑफलाइन फाइल्स शेअर करण्याची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर या अॅपमध्ये आपण आपल्या फाइलचा गुगल ड्राइव्हवर बॅकअपसुद्धा घेऊ शकतो. तर सेफ फोल्डरमध्ये फोल्डरला पिन सेट करून फाइल गोपनीयसुद्धा ठेवू शकतो.

फाइल मॅनेजर प्लस

जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल तर हे अॅप तुमची अनेक कामं सोपी करू शकतं. यातील ‘अॅक्सेस फ्रॉम कम्प्युटर’ फीचरमुळे मोबाइलमधील फाइल कम्प्युटरच्या स्क्रीनवरून अॅक्सेस करू शकतो. यामुळे क्षणार्धात मोबाइल वर असणारी फाइल कम्प्युटरच्या स्क्रीनवर घेऊन मोठ्या स्क्रीनवर अधिक सोयीनं काम करता येतं. तसंच यात गुगल ड्राइव्ह, वन ड्राइव्ह आणि ड्रॉपबॉक्ससारखे क्लाउड स्टोरेजचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचबरोबर फोटो व्ह्यूअर (viewer), म्युजिक प्लेअर आणि टेक्स्ट एडिटरचा इनबिल्ट पर्याय असल्याने अशा टास्कसाठी अॅपच्या बाहेर जावं लागत नाही. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल.

वाचाः

टोटल कमांडर

इतर अॅप्सच्या तुलनेत टोटल कमांडर हे खूप अॅडव्हान्स फीचर्स असलेलं अॅप आहे. या फाइल मॅनेजरच्या सर्चबॉक्समध्ये फाइलची साइज, ती फाइल अॅड केल्याची वेळ असे फिल्टर्स उपलब्ध असतात. त्या फिल्टर्सनुसार फाइल सर्च करू शकतो. तसंच या अॅपमध्ये बुकमार्कचा पर्याय देण्यात आला आहे. आपण या पर्यायाच्या साहाय्यानं जी फाइल हवी असेल तिला बुकमार्क लावू शकतो. त्यामुळे ही फाइल जिफी फोल्डरमध्ये जाते आणि ती अॅपच्या होमस्क्रीन वरही दिसते. हे अॅप गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे.

वाचाः

डिस्क युसेज

हे फाइल मॅनेजर सुरू केल्यावर आपल्या उपकरणाची मेमरी किती आहे हे दाखवणारा साधा इंटरफेस दिसतो. याच इंटरफेसच्या खाली स्क्रोल केल्यास आपल्या मोबाइलमधील किती जागा फोटो, एपीके, पीडीएफ, यांनी घेतली आहे याचं वर्गीकरण असणारं इंटरफेस दिसतं. त्यामुळे आपल्याला नको असणाऱ्या फाइल्स डिलीट करणं सोपं जातं. यामध्ये क्विक सर्च आणि फुल स्क्रीनचा पर्याय देण्यात आला आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

वाचाः

फाइलगेट

हे अॅप आयओएसवरून डाऊनलोड करता येतं. या अॅपमध्ये फाइल्स डिलीट, कॉपी, मूव्ह करण्याबरोबरच झिप फाइल ओपन करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये डॉक्युमेंट व्ह्यूअर (viewer) असून त्यातून आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड, पॉवरपॉइंट आणि एक्सेल फाइल ओपन करू शकतो. या अॅपमध्ये प्रायव्हेट ब्राऊजर असून आपण त्यावर अॅपमधून बाहेर न पडता ब्राऊजिंग करू शकतो. तसंच यात डाऊनलोड मॅनेजर हे फीचरसुद्धा उपलब्ध आहे.

फाइल हब प्लस

हे अॅप अँड्रॉइड आणि आयोएस अशा दोन्हींसाठी उपलब्ध आहे. इतर अॅप्सप्रमाणे याही अॅपमध्ये फाइल सॉर्ट करणं, फाइल रीनेम करणं असे पर्याय उपलब्ध असले तरी यातील काही खास फीचर्स या अॅपला युजरफ्रेंडली बनवतात. अॅप सुरू केल्यावर फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट या ऑप्शन्सचे मोठे आणि आकर्षक आयकॉन्स येतात. या ऑप्शन्सवर क्लिक करा. त्यानंतर याच्या आकर्षक आणि विशिष्ट डिझाइनमुळे फोटोज, व्हिडीओज एका क्षणात शोधू शकतो. यामध्ये फोटोजसाठी स्लाइड शो प्ले करण्याचा पर्याय आहे. तसंच आपण यात फोटोज आणि फाइल्स वायफायच्या मदतीनं ट्रान्सफर करू शकतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here