नवी दिल्लीः रियलमीचे स्मार्टफोन्स तसेच जबरदस्त गॅझेट्स खरेदी करण्याची जबरदस्त संधी आहे. कंपनीने आपल्या Festive Days with First Sale Offersची घोषणा केली आहे. रियलमीचा हा सेल १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. २१ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर ५ हजारांपर्यंत सूट मिळणार आहे. तसेच या सेलमध्ये रियलमीचे स्मार्ट टीव्ही आणि स्मार्टवॉचवर बेस्ट ऑफर दिली आहे.

वाचाः

रियलमी X50 प्रो वर ५ हजारांची सूट
या फोनच्या दोन व्हेरियंटवर ५ हजारांची सूट दिली जात आहे. या सूटनंतर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४१ हजार ९९९ रुपयाऐवजी ३६ हजार ९९९ रुपये झाली आहे. तसेच याच्या १२ जीबी प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४२ हजार ९९९ रुपये झाली आहे.

रियलमी X3 सुपरजूम ३ हजारांनी स्वस्त
या फोनवर ३ हजारांची सूट मिळणार आहे. या सूटनंतर फोनचा ८ जीबी व्हेरियंटला २७ हजार रुपयांऐवजी २४ हजार ९९९ रुपयांत आणि १२ जीबी प्लस २५६ जीबी स्टोरेजला ३२ हजार ९९९ रुपयांऐवजी २९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते.

वाचाः

रियलमी X3 वर ३ हजारांची सूट
१६ ते २१ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये ३ हजारांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. या सूटनंतर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन २१ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. तर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन २२ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो.

रियलमी ६ वर १ हजारांची सूट
या फोनच्या खरेदीवर १ हजारांची सूट देण्यात येणार आहे. सूटनंतर ६ जीबी रॅमचा फोन १३ हजार ९९९ रुपयांत तर ८ जीबी रॅमचा फोन १५ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो.

वाचाः

स्मार्ट टीव्हीवर ३ हजारांची सूट
या सेलमध्ये Realme Smart TV SLED 4K (55 इंच) ला ३ हजारांच्या सूटसोबत खरेदी करता येवू शकते. या सूटनंतर ४२ हजार ९९९ रुपयांचा टीव्ही ३९ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येवू शकतो. कंपनीच्या हेडने या जबरदस्त टीव्हीवर मिळणाऱ्या ऑफर संबंधी ट्विट सुद्धा केले आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here