नवी दिल्लीः गुगलने अँड्रॉयड स्मार्टफोन्ससाठी ६ नवीन फीचर्स रोलआउट केले आहे. नवीन फीचर्स केवळ व्हर्जनसाठी नव्हे तर जुन्या अँड्ऱॉयड व्हर्जन स्मार्टफोनसाठी सुद्धा आहे. नवीन अँड्रॉयड फीचर्सला गुगल असिस्टेंट, ड्यूओ, फोन अॅप आणि दुसऱ्या अॅप्ससाठी आणले आहे.

वाचाः

सर्वात आधी गुगल असिस्टेंट, युजर्सला आपल्या स्मार्टफोन्सवर अॅप्स सर्च करण्यासाठी किंवा ओपन करण्यासाठी याचा वापर करता येवू शकतो. तसेच थेट ‘Hey Google, check the news on Twitter’ किंवा ‘Hey Google, find Motivation Mix on Spotify’ असे बोलून कमांड देवू शकतो. शॉर्टकट क्रिएट करण्यासाठी या कमांड्सला कस्टमाइज सुद्धा केले जावू शकते. गुगलने स्पॉटीफाय, Etsy, Discord आणि वॉलमार्ट यासारख्या कंपन्यांसोबत पार्टनरशीप केली आहे.

वाचाः

गुगलने आपल्या व्हिडिओ कॉलिंग अॅप ड्यूओमध्ये स्क्रीन शेयरिंग ऑप्शनला इनेबल केले आहे. म्हणजेच आता ड्यूओ वरून व्हिडिओ कॉल दरम्यान तुम्ही फोनची स्क्रीन शेयर करू शकाल. गुगलने हे खास फीचर व्हिडिओ मेसेज मध्ये ऑटोमॅटिक कॅप्शनमध्ये सुद्धा अॅड केले आहे. गुगलने गेल्या काही महिन्यापूर्वी घोषणा केली होती. आता गुगलने अँड्रॉयड ९ आणि त्यानंतर आलेल्या व्हर्जनवर चालणाऱ्या फोनमध्ये हे फीचर जारी केले आहे. ज्या लोकांकडून गुगल फोन अॅप नाही ते प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकतील.

वाचाः

अँड्रॉयड फोन्समध्ये एक नवीन फीचर् ‘Sound Notifications’ जारी करण्यात आले आहे. अलार्मिंग नॉइजला अलर्ट म्हणून पाठवतो. कोणत्याही फायर अलार्म, दरवाजाला नॉक करणे, हाउसहोल्ड अप्लायन्सेजला बीप करण्यावर साउंड नोटिफिकेशन्स फ्लॅश, व्हायब्रेट आणि पूश नोटिफिकेशन्स पाठवेल. याला Wear OS वर चालणाऱ्या स्मार्टवॉचवर सेटअप केले जावू शकते. हे Live Transcribe अॅपसोबत उपलब्ध आहे.

वाचाः

गुगलच्या Action Blocks अॅपद्वारे वय संबंधी आणि कॉग्निटीव डिसेबिलिटीजचा सामना करीत असलेल्या छोट्या वाक्याद्वारे चर्चा करू शकते. Action Blocks ला Tobii Dynavox ने हजारो कम्यूनिकेशन्स सिंबलचा फोटो सोबत अपडेट केले आहे. गुगलने जपानी, फ्रेंच, जर्मन आणि इटालियन भाषेसाठी या अॅपला सपोर्टमध्ये अॅड केले आहे. गुगलने नवीन क्रोमकास्ट सोबत आणले आहे. गुगलने आपल्या Play Movies & TV ला गुगल टीव्हीत रिब्रँड करीत आहे. हे अॅप आता अमेरिका मध्ये अँड्रॉयड फोन्ससाठी उपलब्ध आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here