नवी दिल्लीः गुगलने भारतात आपला नवीन अधिकृतपणे लाँच केला आहे. गुगलने पिक्सल ४ए आणि नेस्ट ऑडियो स्मार्ट स्पीकरच्या किंमतीची घोषणा केली आहे. कंपनीने देशात पिक्सल ४ ए ची किंमत ३१ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. परंतु, हा फोन २९ हजार ९९९ रुपयांच्या खास किंमतीत मिळणार आहे. तर नेस्ट ऑडियो स्मार्ट स्पीकरला ७ हजार ९९९ रुपयांत लाँच करण्यात आले आहे.

वाचाः

Google Pixel 4a स्मार्टफोनला ग्लोबल मार्केटमध्ये ३४९ डॉलर म्हणजेच जवळपास २५ हजार ६७३ रुपयांत लाँच केले आहे. आता देशात पिक्सल ४ए ची किंमत पाहून गुगल भारतीय स्मार्टफोन मार्केटला महत्व देत असल्याचे दिसत आहे. नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या पिक्सल फोन्समध्ये पिक्सल ४ ए ला भारतात लाँच केले जात आहे. पिक्सल ४ए ५जी पिक्सललला भारतात लाँच केले नाही. पिक्सल ४ए ला ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज सोबत लाँच केले आहे.

वाचाः

Pixel 4a आणि बिग बिलियन डील मध्ये १६ ऑक्टोबर रोजी फ्लिपकार्टवर उपलब्ध करण्यात येणार आहे. पिक्सल ४ए ची फ्लिपकार्टवरून विक्री करण्यात येणार आहे. तर नेस्ट ऑडियो स्मार्ट स्पीकरला लवकरच आउटलेट्स यासारख्या रिलायन्स रिटेल आणि टाटा क्लिकवर उपलब्ध करण्यात येणार आहे. नेस्ट ऑडियो चॉक आणि चारकोल दोन कलरमध्ये मिळणार आहे.

वाचाः

Google Pixel 4a ची वैशिष्ट्ये
गुगल पिक्सल ४ए मध्ये ५.८ इंचाचा एचडी ओलेड डिस्प्ले आणि कॉर्निंग गोरिला ग्लास ३ दिला आहे. पिक्सल ४ ए केवळ ब्लॅक कलरमध्ये येतो. यात रियरवर फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. पिक्सल ४ए मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३० जी प्रोसेसर दिला आहे. ग्राफिक्ससाठी अॅड्रेनो 618GPU दिला आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. सर्व पिक्सलच्या फोनप्रमाणे नवीन पिक्सल ४ ए मध्ये सुद्धा सर्वात खास कॅमेरा आहे. पिक्सल ४ए मध्ये रियरवर १२.२ मेगापिक्सलचा तर फ्रंटमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यसाठी यात 3140mAh बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

वाचाः

गुगल पिक्सल ४ए मध्ये रेकॉर्डर फीचर मिळते. जे Google Docs ने कनेक्ट होते. हे फीचर ट्रान्सक्रिप्शन आणि रेकॉर्डिंग्स (केवळ इंग्रजी) ला सेव करू शकतो. फोनमध्ये रियल टाइम इमरजन्सी नोटिफिकेशन्स साठी Personal Safety अॅप सारखे फीचर्स दिले आहे. हे अॅप Live Caption सोबत येते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here