वाचाः
Oppo Reno 3 Pro स्मार्टफोनच्या किंमतीत दोन हजारांची कपात करण्यात आल्यानंतर या फोनच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २५ हजार ९९० रुपये झाली आहे. या नवीन किंमतीला अॅमेझॉनवर लिस्ट केले आहे. परंतु, कंपनीने अद्याप याची अधिकृतपणे घोषणा केली नाही.
वाचाः
कंपनीने ऑगस्टमध्ये ओप्पो रेनो ३ प्रोचा ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटला अनुक्रमे २ हजार आणि ३ हजार रुपयांची कपात केली होती. त्यामुळे या फोनची किंमत आधी २७ हजार ९९० रुपये आणि २९ हजार ९९० रुपये झाली होती. परंतु, सध्या ओप्पो रेनोच्या टॉप अँड व्हेरियंटच्या किंमतीत कोणतीही कपात करण्यात आल्याची माहिती आहे.
वाचाः
ओप्पो रेनो ३ प्रो मध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी९५ प्रोसेसर दिला आहे. हँडसेटमध्ये १२८ जीबी व २५६ जीबी स्टोरेजचा पर्याय उपलब्ध आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम आहे. हँडसेटमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, १३ मेगापिक्सलचा टेलिफोटो आणि २ मेगापिक्सलचा मोनो कॅमेरा उपलब्ध आहे. फोनच्या पुढच्या साईडला ४४ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ३० वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times